-
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान २० मे रोजी देशभरातील विविध भागात पार पडले. (Photo-Loksatta Graphics Team)
-
या टप्प्याच्या प्रचारात सर्वच पक्षांनी जोरदार ताकदीने आपल्या उमेदवारांचा प्रचार केला. (Photo-Express Photo by Pawan Khengre)
-
अठराव्या लोकसभेसाठी देशात एनडीए आणि इंडिया आघाडी अशी थेट लढत होतेय. (Photo-Express Photo by Pawan Khengre)
-
भाजपाने ४०० पार असा नारा यावेळी दिला आहे आणि तसा प्रचारही देशभरात पाहायला मिळत आहे. (Photo- Amit Shah/Facebook Page)
-
दरम्यान पाचव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी एक वक्तव्य केलं. ते म्हणाले “या पाचव्या टप्प्यातच आम्ही एनडीएने ३१० जिंकल्या आहेत.” (Photo- Amit Shah/Facebook Page)
-
अमित शाह ओडिशातील संबलपूर येथे प्रचारसभेत बोलत होते. शाह पुढे म्हणाले सहाव्या आणि सातव्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर आम्ही ४०० पेक्षा जास्त जागा जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Photo- Amit Shah/Facebook Page)
-
त्यांनी भाजपा किती जागा जिंकेल अस सांगितलं नसलं तरी एनडीए आघाडीचा आकडा मात्र त्यांनी सांगितला आहे. (Photo- Amit Shah/Facebook Page)
-
तर दुसऱ्या बाजूला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ४ जूनला देशात इंडिया आघाडीचे सरकार येत आहे, असं सांगितलं आहे. (Photo- Arvind Kejriwal/Facebook Page)
-
केजरीवाल म्हणाले “भाजपाच्या जागी आम्ही इंडिया आघाडीतर्फे देशात ३०० जागांपेक्षा अधिक जागा जिंकून सरकार बनवत आहोत. पाचव्या टप्प्यानंतर भाजपाचा पराभव होत असल्याचं सर्वेक्षण सांगत आहेत.” या निवडणुकीत भाजपा पराभूत होणार आहे अस स्पष्ट आहे”, असं केजरीवाल म्हणाले. (Photo- Arvind Kejriwal/Facebook Page)
-
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि जयराम रमेश यांनीदेखील याआधी भाजपाचा पराभव होणार असल्याचे म्हंटले आहे. (Photo-ANI)

Sanjay Raut : संजय राऊत यांचा रोख कुणाकडे? “महाराष्ट्रातला एक बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे, त्याला…”