-
देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशात विविध ठिकाणी जाहीर सभा पार पडत आहेत.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बिहारमधील महाराजगंज येथील एका सभेला संबोधित केलं. यावेळी मोदींनी राजकीय वारसाबद्दल मोठं विधान केलं.
-
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठी भविष्यवाणी केली होती.
-
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या या विधानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला.
-
या सर्व चर्चेनंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील महाराजगंज येथील प्रचाराच्या सभेत या संदर्भात मोठं भाष्य केलं.
-
“माझा उत्तराधिकारी कोणीही नाही, या देशातील जनताच माझी उत्तराधिकारी आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राजकीय वारसासंदर्भात स्पष्टीकरण दिले. त्यामुळे विरोधकांनी सुरु केलेल्या या चर्चांवर आता पडदा पडला आहे.
-
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील महाराजगंज येथील प्रचाराच्या सभेत काँग्रेससह इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.
-
याबरोबरच ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर इंडिया आघाडीला मोठा धक्का बसेल, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी हल्लाबोल केला. (सर्व फोटो-पंतप्रधान नरेंद्र मोदी फेसबुक पेजवरून साभार)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”