-
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज देशभरात विविध भागात मतदान होत आहे.
-
सकाळी ७ वाजल्यापासून या मतदानाला सुरुवात झाली आहे.
-
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज, २५ मे रोजी सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ५८ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. आज हरियाणातील सर्व १० मतदारसंघात, उत्तरप्रदेशमधील १४ जागांवर तर दिल्लीतील सर्व ७ ठिकाणी, बिहार ८, झारखंड ४, ओडिशा ६, पश्चिम बंगालमध्ये ८ जागांवर मतदान सुरू झाले आहे.
-
या ५८ मतदारसंघांमध्ये ११.१३ कोटी मतदार असून ५.८४ कोटी पुरुष व ५.२९ कोटी महिला मतदारांचा समोवश आहे
-
कोणते दिग्गज मैदानात?
मेनका गांधी, मनोज तिवारी, कन्हैया कुमार, बांसुरी स्वराज यांच्यासह देशातील अनेक दिग्गज उमेदवार या टप्प्यात मैदानात उतरले आहेत आणि त्यांचं भवितव्य आज मतदार मतदानातून ठरवणार आहेत. -
मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
सध्या देशामध्ये उन्हाचा पारा वाढलेला आहे. त्यामुळे मतदारांसाठी विशेष सोयी सुविधा देण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत.
-
दरम्यान, देशात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे.
-
तर, सर्व टप्प्यांतील मतदानाचा निकाल ४ जून २०२४ रोजी घोषित केला जाणार आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”