-
लोकसभा निवडणुकीच्या २०२०४ च्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. बलियाचे दिग्गज नेते नारद राय हे सपा सोडून भाजपात दाखल झाले आहेत. (सर्व फोटो- नारद राय या फेसबुक पेजवरुन साभार)
-
नारद राय हे तीन दशकांहून अधिक काळ उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रिय असून भूमिहार समाजाचे मोठे नेते आहेत. नारद राय हे सपा सरकारमध्ये माजी मंत्री आणि माजी आमदारही राहिले आहेत.
-
नारद राय यांच्याकडे लखनऊपासून वाराणसी आणि बलियापर्यंत करोडोंची मालमत्ता आहे. त्याच्याकडे किती मालमत्ता आहे तसेच त्यांचं शिक्षण किती याबद्दल जाणून घेऊया
-
myneta.info वेबसाइटच्या माहितीनुसार, नारद राय हे सुमारे १२ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत.
-
त्यांच्याकडे १८ लाख रुपये किंमतीचे सोने असून पत्नीकडे २७ लाख रुपये किंमतीचे सोने आहे. दोघांकडे ४९ लाखांहून अधिक किंमतीचे दागिने आहेत.
-
नारद राय यांच्याकडे बलिया आणि बक्सरमध्ये ४० लाख रुपयांची शेतजमीन आहे.
-
याशिवाय लखनऊमध्ये त्यांच्या नावावर २ आणि पत्नीच्या नावावर १ एनए प्लॉट्स आहेत, या तिन्हींची किंमत ४ कोटी ८९ लाख १८ हजार रुपये आहे.
-
नारद राय यांचे बलिया येथे दोन आणि वाराणसीमध्ये एक घर आहे. तसेच त्यांच्या पत्नीच्या नावावरही वाराणसीमध्ये घर आहे. या चार घरांची किंमत ५ कोटी ८५ लाख एवढी आहे.
-
शिक्षणाबद्दल सांगायचे तर, नारद राय यांनी १९८३ मध्ये गोरखपूर विद्यापीठाच्या मुरली मनोहर टाउन पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजमधून कृषी विषयात एम.एस.सी केले आहे.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख