-
उत्तर प्रदेशमध्ये काल राहुल गांधी यांची प्रचारसभा होती.
-
वाराणसीमध्ये म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात ही प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती.
-
यावेळी त्यांनी भाषण करताना भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
-
राहुल गांधींचं या भाषणातील एक वक्तव्य सध्या देशभर चर्चेत आले आहे.
-
राहुल गांधी म्हणाले. “आम्ही देशातील गरिबांच्या बँक खात्यांमध्ये लाखो रुपये टाकणार आहोत. महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत आम्ही हे पैसे गरीब महिलांच्या बँक खात्यांमध्ये टाकत आहोत.” असे ते म्हणाले आहेत.
-
ते पुढे म्हणाले, “देशातील करोडो गरीब महिलांच्या खात्यात महिन्याला ८ हजार ५०० रुपये येतील. हे जुलैमध्ये सुरु होईल मग ते ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबर, डिसेंबर असं सुरूच राहणार आहे, ५ जुलै या दिवशी तुम्ही बँक खाती तपासा ‘खटाखट खटाखट’ बँक खात्यात पैसे येतील” असं राहुल यांनी म्हटलं आहे.
-
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी हे त्यांच्या अनेक सभांमध्ये ‘खटाखट खटाखट’ गरिबी हटाव असे विधान करताना दिसत आहेत.
-
शेवटच्या टप्प्यासाठी आता मतदान शिल्लक आहे. हे मतदान १ जून रोजी होणार आहे.
-
तर निकाल ४ जून रोजी लागणार आहे.
-
(सर्व फोटो- राहुल गांधी/एक्स)

Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेच्या घरी आली नवी पाहुणी! खरेदी केली आलिशान गाडी, किंमत किती?