प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची दोन वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती.सिद्धूची आज २९ मे रोजी पुण्यतिथी असून त्यानिमित्त काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी आज सिदधूचे वडिल बलकार सिंग यांची भेट घेतली आहे.लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी राहुल गांधी पंजाब दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी ही भेट घेऊन श्रद्धांजली वाहिली आहे.याबद्दलचा एक व्हिडीओ आणि एक पोस्ट देखील राहुल गांधी यांनी शेअर केली आहे. काँग्रेसच्या आणि वैयक्तिक सोशल मिडिया (फेसबुक आणि एक्स) प्लॅटफॉर्मवर त्यांनी सिद्धूचे वडिल बलकार सिंग यांच्याबरोबरचे फोटो आणि श्रद्धांजली वाहतानाचे फोटो टाकले आहेत.या फोटोमध्ये राहुल गांधी सिद्धू मुसेवाला याच्या प्रतिमेवर पुष्पवर्षाव करून अभिवादन करताना दिसत आहे.पंजाबमधील लुधियानात कॉंग्रेसचे उमेदवार अमरिंदर सिंग राजा वडिंग यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज दानमंदी इथे पोहचले. इथे सभेचे नियोजन केले होते.या सभेत सिद्धू मुसेवालाचा मोठा फोटो ठेवला होता. यावेळी सिद्धू मुसेवालाचे वडिल आणि राहुल यांनी मुसेवालाला श्रद्धांजली वाहिली. यानंतर त्यांनी भाषण केले, या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली. “नरेंद्र मोदी हे संविधान बदलणार आहेत सत्तर वर्षात पहिल्यांदा ही निवडणूक संविधान वाचवण्यासाठी आपण लढतोय” असं ते म्हणाले आहेत.सिद्धू मुसेवालाने कॉंग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. आप उमेदवार विजय सिंगला यांनी ६३ हजार मतांच्या फरकाने त्याचा पराभव केला होता. नुकतेच (सर्व फोटो- राहुल गांधी एक्स)