-
राज्यामध्ये विधानपरिषदेच्या ४ जागांची निवडणूक हणार आहे. निवडणूक आयोगाने याबद्दल माहिती दिली आहे.
-
मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर , नाशिक शिक्षक या चार जागांवर निवडणूक होणार आहे.
-
निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार २६ जूनला मतदान होईल. मतमोजणी १ जुलैला करण्यात येणार आहे.
-
३१ मे ते ७ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
-
मुंबई शिक्षक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाकडून शिवाजीराव नलावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
-
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले शिवाजीराव पक्षाचे जुने नेते आहेत.
-
नलावडे यांनी याआधी दोनवेळा मुंबईच्या पूर्व भागातील मतदारसंघातून विधानसभा निवडणुकी लढली आहे.
-
पदवीधर मतदारसंघातही त्यांनी स्वतःला आजमावून पाहिलंय परंतु त्यातही त्यांना यश मिळालं नाही.
-
सहकार क्षेत्रातील मोठ नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते त्यामुळेच त्यांना ही उमेदवारी मिळाली असल्याची माहिती आहे.
-
यावर्षीची मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पक्ष पूर्ण ताकदीने लढेल आणि पक्षाने दिलेल्या संधीचं सोन करणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
-
सर्व फोटो साभार – NCPSpeaks_Official फेसबुक पेज)
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश