-
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी उद्या १ जून रोजी मतदान होणार आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाचा उद्याच्या टप्प्यात समावेश आहे.
-
वाराणसी हा मतदारसंघ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उमेदवारीमुळे देशभर चर्चेत आहे. त्यांना भाजपाने तिसऱ्यांदा या ठिकाणाहून उमेदवार घोषित केलं आहे.
-
बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदारसंघातून भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढत आहे. काँग्रेसने मंडीत विक्रमादित्य सिंह यांना उमेदवारी दिली आहे.
-
चंदीगडमधील काँग्रेस उमेदवार मनीष तिवारी हे देखील यंदा चर्चेत आहेत. भाजपाने इथे संजय टंडन यांना उमेदवारी दिली आहे.
-
पश्चिम बंगालमधील अभिषेक बॅनर्जी हे उमेदवार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आहेत. ते डायमंड हार्बर या मतदारसंघात तृणमूलच्या तिकिटावर मैदानात उतरले आहेत.
-
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालप्रसाद यादव यांची मुलगी मीसा ही पाटलीपुत्र मतदासंघांतून निवडणूक लढत आहे. पहिलीच निवडणूक असल्यानं राजद नेत्या मीसा भारती यांची चर्चा होत आहे.
-
पंजाबच्या पटियाला मतदारसंघात भाजपाने परनीत कौर यांना उमेदवारी दिली असून त्या अगोदर काँग्रेसच्या खासदार राहिल्या आहेत. त्या माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत.
-
अभिनेता रवी किशन उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधून निवडणूक लढत आहेत. त्यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड मानला जातो.
-
झारखंडमध्ये मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या सून भाजपाने रिंगणात उतरवल्या आहेत. दुमका या मतदारसंघात त्यांच्याविरुद्ध नलिनी सोरेन या झारखंड मुक्ती मोर्चा च्या उमेदवार आहेत. हे देखील पहा- PHOTOS : नरेंद्र मोदी, असदुद्दीन ओवैसी ते ममता बॅनर्जी; अखेरच्या टप्प्यात प्रचारासाठी पुढाऱ्यांची एकच लगबग
धनंजय मुंडेंच्या कुटुंबात गृहकलह? आई-भाऊ वेगळे का राहतात? भावानेच केलं स्पष्ट; म्हणाले…