-
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले सर्व भाजपाचेच उमेदवार आहेत. परंतु सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेल्या टॉप १० खासदारांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याबद्दल आपण जाणून घेऊया
-
सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या खासदारांमध्ये पहिला क्रमांक आहे सी आर पाटील या खासदारांचा. हे गुजरात मधील नवसारी मतदार संघातील खासदार आहेत. यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ६ लाख ८९ हजार ६६८ मते मिळाली होती.
-
सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेल्या खासदारांमध्ये दुसरा क्रमांक आहे संजय भाटिया यांचा. संजय भाटिया हे हरियाणातील कर्नाल मतदारसंघाचे खासदार आहेत, त्यांना ६ लाख ५६ हजार १४२ मते मिळाली होती.
-
तर तिसऱ्या क्रमांकावर कृष्णपाल गुजर आहेत. हरियाणातील फरीदाबाद या मतदारसंघाचे खासदार असलेले कृष्णपाल यांना ६ लाख ३८ हजार २३९ मते मिळाली.
-
सुभाष चंद्र हे राजस्थान मधील भीलवाडा या मतदार संघाचे खासदार आहेत. यांना २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत ६ लाख १२ हजार मते मिळाली.
-
गुजरातच्या वडोदरा या मतदार संघात २०१९ मध्ये रंजनबेन भट यांना ५ लाख ८९ हजार मतांनी विजय मिळाला.
-
तर सहाव्या क्रमांकावर प्रवेश वर्मा आहेत. पश्चिम दिल्ली या मतदारसंघात ते उमेदवार होते, यांना ५ लाख ७८ हजार ४८६ मतांनी विजय मिळाला.
-
सीपी जोशी चितोडगड राजस्थान मधील उमेदवार, ५ लाख ७६ हजार २८७ मतांनी विजयी झाले.
-
गृहमंत्री अमित शहा गांधीनगर गुजरात मधील उमेदवार ५ लाख ५७ हजार १४ मतांनी विजयी.
-
उत्तर पश्चिम दिल्ली मतदार संघामध्ये भाजपाचे हंसराज हंस हे उमेदवार २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ५ लाख ५३ हजार ८९७ मतांनी विजयी झाले.
-
तर, उदय प्रताप सिंह होशंगाबाद मध्य प्रदेश मधील उमेदवार ५ लाख ५३ हजार ६८२ मतांनी विजयी झाले.
-
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये सर्वाधिक मताधिक्य भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी मिळवलं होतं मात्र पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेले नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक मतदान मिळवलेल्या टॉप १० उमेदवारांमध्ये स्थान मिळवले नव्हते.
-
२०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना ५ लाख १६ हजार ५९३ मते मिळाली होती. म्हणजेच वरील १० उमेदवारांपेक्षा कमी मतांची टक्केवारी आणि मतदान पंतप्रधानांना मिळाले होते.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”