-
आज देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. या मतदानामध्ये स्वतःचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उमेदवार तसेच राजकीय नेते यांनी जवळील मतदान केंद्रावर हजेरी लावली आहे आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत. (Photo-ANI)
-
पटियाला लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार असलेले धर्मवीर गांधी यांनी मतदान केंद्रावर जाऊन त्यांचे मतदान पार पाडले. (Photo-ANI)
-
एनडीएचे गया लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जितन राम मांझी यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासहित मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. (Photo-ANI)
-
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि त्यांच्या पत्नी गुरप्रित कौर यांनी मतदान केले आणि सर्वांना मतदान करा असे आवाहन केले. (Photo-ANI)
-
उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि वाराणसी मधील उमेदवार अजय राय यांनी मतदानाचा हक्क बजावला. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. (Photo-ANI)
-
हिमाचल प्रदेशमधील भाजपच्या उमेदवार कंगना राणावत मंडी येथून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांनी आज मतदानाचा हक्क बजावला आणि मतदारांना मतदान करा असे आवाहन केले. (Photo-ANI)
-
राजद नेत्या राबडी देवी यांनी बिहारमधील पटनामध्ये मतदान केले. यावेळी त्या म्हणाल्या “बिहारमध्ये आम्ही 40 जागांवर विजयी होऊ.” (Photo-ANI)
-
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चूघ यांनी सहकुटुंब मतदान केले. (Photo-ANI)
-
अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ते म्हणाले “मी भाजपाचा सैनिक आहे आणि मी माझे कर्तव्य पार पाडले आहे.” (Photo-ANI)
-
भाजपनेते अनुराग ठाकूर यांनी हमीरपुर येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ते म्हणाले, “भाजपच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत खूप काम केले आहे. आम्हाला कार्यकर्त्यांचे भरपूर प्रेम मिळाले आणि याचा आम्हाला आनंद आहे.” (Photo-ANI)
-
भारताचा माजी फिरकीपटू क्रिकेटर हरभजन सिंग यानेही मतदानाचा हक्क बजावला. (Photo-ANI)
-
भाजपाचे खासदार आणि बिहार मधील पटना येथील उमेदवार रविशंकर प्रसाद यांनी सपत्नीक मतदान केंद्रावर हजेरी लावून मतदानाचा हक्क बजावला. (Photo-ANI)
-
दरम्यान, पंजाबमधील फिरोजपुर या छावणीतील देशाच्या सैनिकांनी त्यांच्या मतदानाला हजेरी लावली. त्यांच्यासाठी विशेष मतदान केंद्राची सोय निवडणूक आयोगाने केली होती. (Photo-ANI)
-
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणारे उमेदवार, अभिषेक बॅनर्जी यांनी डायमंड हार्बर या भागातील एका मतदान केंद्रावर हजेरी लावून मतदानाचा हक्क बजावला. (Photo-ANI)
-
तसेच शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल, यांनीही त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. (Photo-ANI)
-
पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी बादल गावातील मतदान केंद्रावर, त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. (Photo-ANI)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”