-
१) स्मृती इराणी : उत्तर प्रदेशची व्हीआयपी जागा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेठी लोकसभेच्या जागेवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यावेळी अमेठीमधून भाजपाकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार स्मृती इराणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, अमेठीतून गांधी घराण्याच्या जवळचे मानले जाणारे किशोरी लाल शर्मा काँग्रेसकडून निवडणूक लढवीत आहेत.
-
२) बन्सुरी स्वराज : देशाच्या परराष्ट्रमंत्री राहिलेल्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बन्सुरी स्वराज या हॉट सीट समजल्या जाणाऱ्या नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवार आहेत. त्यांना आम आदमी पक्षाचे सोमनाथ भारती यांनी कडवी टक्कर दिली आहे. येथून मीनाक्षी लेखी सलग दोनदा विजयी झाल्या आहेत. सीएम केजरीवाल यांचा विधानसभा मतदारसंघही याच लोकसभा मतदारसंघात येतो. दुसरीकडे हा भाग काँग्रेस नेते अजय माकन यांचाही असल्याचे समजते.
-
३) डिंपल यादव : उत्तर प्रदेशातील सर्वांत मोठ्या कुटुंबातील अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी मैनपुरीतून पहिली महिला खासदार बनून इतिहास रचला होता. त्यांनी पुन्हा एकदा मैनपुरीतून निवडणूक लढवली आहे. त्यांची लढत भाजपाचे उमेदवार ठाकूर जयवीर सिंह यांच्याशी झाली आहे. त्यामुळे मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून कोण कोणाचा पराभव करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
-
४) तमिलीसाई सुंदरराजन : तेलंगणाच्या राज्यपाल व पुद्दुचेरीच्या एलजी पदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. तमिलीसाई सुंदरराजन यांनी भाजपाच्या निवडणूक चिन्हावर दक्षिण चेन्नई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आहे.
-
५) मिसा भारती : बिहारची राजधानी पाटणा येथील लोकसभेच्या दोन जागांपैकी पाटलीपुत्र ही एक जागा आहे. येथून आरजेडी सुप्रीमो लालू यादव यांची मोठी कन्या मिसा भारती पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांची लढत भाजपाचे विद्यमान खासदार व एनडीएचे उमेदवार रामकृपाल यादव यांच्याशी आहे. अहवालांवर विश्वास ठेवला, तर वातावरण एमसीआय भारतीच्या बाजूने असल्याचे दिसते.
-
६) माधवी लता : हैदराबाद लोकसभेच्या जागेसाठी विद्यमान खासदार व AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि भाजपाच्या माधवी लता यांच्यात लढत आहे. त्यामुळे हैदराबादच्या जागेवर मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार ओवैसी की माधवी लता हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
-
७) कंगना रणौत : हिमाचल प्रदेशमध्ये लोकसभेच्या चार जागा आहेत. तेथे मतदान सातव्या म्हणजे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पार पडले. बॉलीवूडमधून राजकारणात प्रवेश केलेल्या कंगना रणौत यांना भाजपाने मंडी जागेवर तिकीट दिले; तर काँग्रेसने हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह व प्रतिभा सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांना उमेदवारी दिली. विक्रमादित्य सिंह हिमाचल प्रदेश सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री आणि शिमला (ग्रामीण) मतदारसंघाचे आमदार आहेत.
-
८) महुआ मोईत्रा : लोकसभेतून निलंबित करण्यात आलेल्या टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांनी पश्चिम बंगालच्या कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवली आहे. महुआ मोईत्रा यांच्याविरोधात भाजपाकडून राजमाता अमृता राय या उभ्या आहेत; तर माकपचे एसएम सादी हेही लढतीत आहेत. पण या वेळी महुआ मोईत्रा पुन्हा लोकसभेत परतणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
-
९) वाय.एस. शर्मिला रेड्डी : आंध्र प्रदेशमध्ये मुख्य लढत युवाजन श्रमिका रिथू काँग्रेस पक्ष आणि तेलुगू देसम पक्ष यांच्यात आहे. त्यासोबतच काँग्रेस पक्षही जोरदारपणे निवडणूक लढवीत आहे. वायएसआर काँग्रेस पक्षाने वायएस अविनाश रेड्डी; तर तेलुगू देसम पक्षाने चदिपिरल्ला भूपेश सुब्बरामी रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. वायएस शर्मिला काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवीत आहेत. त्यात वायएस शर्मिला काँग्रेस पक्षाचे नशीब पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशाने कडप्पा लोकसभा जागेसाठी लढत आहेत.
-
१०) हेमा मालिनी : भाजपाने हेमा मालिनी यांना मथुरा लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. या जागेसाठी दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान झाले. आता हेमा मलिना तिसऱ्यांदा खासदार होणार का हे पाहावे लागेल.
-
११) हरसिमरत कौर बादल : पंजाबमध्ये भटिंडा ही सर्वांत मोठी हॉट सीट मानली जाते. जिथून सर्वांत श्रीमंत बादल कुटुंबातील सून हरसिमरत कौर बादल या निवडणूक लढवीत आहेत. अकाली दलाच्या उमेदवार हरसिमरत कौर यांचा थेट सामना भाजपाच्या परमपाल कौर यांच्याशी आहे. मात्र, भटिंडामध्ये हरसिमरत कौर भक्कम स्थिती दाखवीत असून, त्या निवडणूक जिंकू शकतात.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”