-
काल ४ जून रोजी देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले.
-
दिवसभर सुरू असलेल्या मतमोजणीनंतर विविध फेऱ्यानंतर नवनवीन अपडेट येत होत्या पण दिवसाखेर देशातील आणि राज्यातील सर्व चित्र स्पष्ट झाले होते.
-
यामध्ये एनडीए आघाडी आणि इंडिया आघाडी या भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या आघाड्यांना देशांमध्ये ५४३ जागांपैकी किती जागा कोणाला मिळाल्या याचे चित्र स्पष्ट झाले आहे. एनडीएला २९३ जागा तर इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या आहेत. अन्य जणांना १८ जागांवर विजय प्राप्त झाला आहे.
-
यानंतर देशभरातील नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. पंतप्रधान मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांनी काय प्रतिक्रिया दिल्या जाणून घेऊया.
-
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच एक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले “आज होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत आम्ही चर्चा करू आणि पुढील रणनीती ठरवू. सध्यातरी भाजपच्या कोणत्याही मित्र पक्षासोबत आमची कुठलीही चर्चा झाली नाही. नितेश कुमार, चंद्राबाबू यांना सोबत घेण्यावरही कोणतीही चर्चा नसल्याचं त्यावेळी यांनी सांगितलं. जनतेमध्ये महागाई आणि बेरोजगारी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार बद्दल तीव्र नाराजी असल्यामुळे हे निकाल आले आहेत.” असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे.
-
उद्धव ठाकरे म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचं मत व्यक्त केला आहे ते म्हणाले इंडिया आघाडीने देशात सत्ता स्थापनेचा दावा केला पाहिजे जुलमी सरकार उंबरठ्यावर असून त्यांना आपण हटवायला पाहिजे ते पुढे म्हणाले या निवडणुकीच्या निकालातून देशातील सर्वसामान्य जनतेने त्यांची ताकद दाखवून दिली आहे. त्याबद्दल मी देशातील जनतेचं अभिनंदन करतो. सत्ताधारी लोक मस्तवाल झाले तर आपण त्यांना हरवू शकतो, एका बोटाच्या सहाय्याने त्यांना सत्तेतून हटवू शकतो, त्यांचा उधळलेला वारू रोखू शकतो आणि जनतेने तेच केलं आहे. त्याबद्दल मला जनतेचा अभिमान आहे.सत्ताधारी लोक मस्तवाल झाले तर आपण त्यांना हरवू शकतो, एका बोटाच्या सहाय्याने त्यांना सत्तेतून हटवू शकतो, त्यांचा उधळलेला वारू रोखू शकतो आणि जनतेने तेच केलं आहे. त्याबद्दल मला जनतेचा अभिमान आहे.
-
देशामध्ये लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना पंतप्रधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसने राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीपेक्षा इंडिया आघाडीने यावेळी चांगलं काम केलं आहे. ही निवडणूक मोदी विरुद्ध जनता अशी झाली. अशी टिप्पणी मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. हा निकाल जनतेचा असून हा विजय लोकशाहीचा असल्याचं खरगे यांनी नमूद केलं.
-
तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील गरिबांनी संविधानाला वाचवलं आणि आम्ही त्यांच्या सोबत उभे आहोत. अशी प्रतिक्रिया लोकसभा निवडणुकीच्या निकालावर दिली आहे.
-
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या निकालानंतर जनतेला संबोधित केले. यावेळी ते भावुक झाले. पंतप्रधान मोदी म्हणाले “माझ्या आईच्या निधनानंतरची ही पहिली निवडणूक होती आणि हा क्षण मला अतिशय भावुक करणारा असा क्षण आहे. देशाच्या कोटी माता भगिनींनी मला माझ्या आईची कमतरता भासू दिली नाही. मी देशात जिथे जिथे गेलो तिथे तिथे माझ्या आया बहिणींनी माझ्या माता भगिनींनी मला भरपूर स्नेह आणि आशीर्वाद दिला.” अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”