-
भारतात पार पडलेल्या २०२४ लोकसभा निवडणुकीने मागील अनेक विक्रम मोडीत काढले आहे. सेंटर फॉर मीडिया स्टडीजच्या अभ्यासानुसार, ही निवडणूक जगातील सर्वांत महागडी निवडणूक ठरली आहे. (Express photograph by Arul Horizon)
-
या अभ्यासानुसार, भारतात पार पडलेल्या या निवडणुकीतील एका मताची किंमत अंदाजे १४०० रुपये सांगण्यात आली आहे. (Express photograph by Pradip Das)
-
सत्ताधारी भाजपा पासून, काँग्रेस आणि समाजवादी पक्षापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांकडून मत मिळवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. (Express Photo by Amit Chakravarty)
-
काही अहवालांनुसार, यंदाच्या निवडणुकांमध्ये १ लाख कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. या तुलनेत २०१९ सालचा खर्च याच्या ५०% किंवा त्यापेक्षाही कमी होता. मागच्या लोकसभा निवडणुकीत ५५ ते ६६ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याचे सांगितले जाते. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
२०२४ लोकसभा निवडणुकीसाठी एकूण अंदाजे १.३५ लाख कोटी खर्च करण्यात आले आहेत. या खर्चाने २०२० साली झालेल्या युएस निवडणुकीलाही मागे टाकले आहे. या निवडणुकीमध्ये १.२ लाख कोटी खर्च झाले होते. (Express photograph by Arul Horizon)
-
भारतीय निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. प्रत्येक खासदार कायदेशीररित्या ९५ लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकतो, तर विधानसभेचे सदस्याला (आमदार) त्यांच्या राज्यानुसार २८ लाख ते ४० लाख रुपये खर्च करण्याची मुभा आहे. (Express photo by Narendra vaskar)
-
अरुणाचल प्रदेशसारख्या छोट्या राज्यांमध्ये खासदारांसाठी खर्चाची मर्यादा ७५ लाख रुपये आणि आमदारांसाठी २८ लाख रुपये इतकी आहे. या मर्यादा २०२२ मध्ये महागाईचा विचार करून सुधारित करण्यात आल्या. (Express photograph by Arul Horizon)
-
वैयक्तिक उमेदवारांना निवडणुकांसाठी खर्चाची मर्यादा घालून दिली असली राजकीय पक्षांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवर कोणतीही मर्यादा नाही. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
दरम्यान, उमेदवारांच्या खर्च करण्याच्या मर्यादेत लक्षणीय वाढ झाली आहे. १९५१-५२च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उमेदवार २५ हजार खर्च करू शकत होता. ही मर्यादा सुमारे ३०० पट वाढून ७५-९५ लाख झाली आहे. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
तर एकूण निवडणूक खर्च १९९८ साली ९ हजार कोटी रुपयांवरून सहापटीने वाढून २०१९ मध्ये सुमारे ५५ हजार कोटी रुपये झाला आहे. (Express Photo By Ganesh Shirsekar)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”