-
लोकसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ३७ जागांवर समाजवादी पक्षाला यश मिळाले आहे आणि उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा पक्ष अशी ओळखही मिळाली आहे. समाजवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये पाच महिला उमेदवारांना मैदानात उतरवले होते. दरम्यान या निकालानंतर त्यांची सगळीकडे चर्चा होत आहे. (Indian Express)
-
या पाचही महिलांनी उत्तर प्रदेशमधील त्यांच्या मतदारसंघांमध्ये विजयी प्राप्त केला आहे. यामध्ये दोन महिला अशा आहेत ज्या खूपच कमी वयामध्ये खासदार बनल्या आहेत. (Indian Express)
-
समाजवादी पक्षाच्या या महिला उमेदवारांमध्ये पहिला क्रमांक आहे प्रिया सरोज यांचा. यांनी खूपच कमी वयामध्ये खासदार बनण्याचा विक्रम केला आहे. मछली शहर या मतदारसंघातून विजय प्राप्त केलेल्या प्रिया सरोज यांचे वय फक्त २५ वर्षे आहे आणि समाजवादी पक्षाच्या माजी खासदार तुफानी सरोज यांच्या त्या कन्या आहेत. (@Priya Saroj/FB)
-
या यादीत दुसरा क्रमांक आहे इकरा हसन यांचा. यांचीही मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. फक्त २७ वर्ष वय असलेल्या इकरा यांनी कैराना लोकसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढवली आणि त्या खासदार झाल्या आहेत. भाजपाच्या प्रदीप कुमार यांना ६९ हजार ११६ मतांनी त्यांनी पराभूत केलं आहे. (@Iqra Munawwar Hasan/Fb)
-
इकरा हसन ह्या राजकारणामध्ये फार सक्रिय असतात, कारण त्यांना कुटुंबाकडून राजकारणाचा वारसा मिळाला आहे. त्यांचे आजोबा आणि त्यांचे वडील दोघेही खासदार राहिलेले आहेत. आता त्यांचे भाऊ नाहिद हसन हे तिसऱ्यांदा खासदार बनले आहेत. (@Iqra Munawwar Hasan/Fb)
-
समाजवादी पक्षाच्या तिसऱ्या उमेदवार आहेत रुची वीरा. यांनी मुरादाबाद मतदारसंघांमध्ये विजय प्राप्त केला आहे. बिजनोर येथील रहिवासी रुची विरा यांनी भाजपाचे उमेदवार कुंवर सर्वेश कुमार यांना १ लाख ५७ हजार ६३ मतांनी पराभूत केले. (@Ruchi Vira/FB)
-
बांदा या मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या कृष्णा देवी शिवशंकर पटेल यांनी पक्षाच्या विश्वासाला खरं ठरवलं आहे. त्यांनी भाजपाच्या आर के सिंह पटेल यांचा ७१ हजार २१० मतांनी पराभव केला आहे. (@myneta.info)
-
तर सपाच्या महिला उमेदवारांच्या यादीमध्ये पाचवा क्रमांक आहे अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचा. डिंपल यांनी मैनपुरी या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त केला आहे. त्यांनी भाजपाचे उमेदवार जयवीर सिंह यांना २ लाख २१ हजार ६३९ मतांच्या फरकाने पराभूत केल आहे. (Indian Express)
-
मुलायम सिंह यादव यांच्या परिवारासाठी मैनपुरी हा मतदारसंघ अगोदरपासूनच महत्त्वपूर्ण राहिला आहे. १९९५ पासून आत्तापर्यंत या मतदारसंघावर मुलायम सिंह यादव यांच्याच परिवाराची पकड राहिली आहे. मुलायम यांच्या निधनानंतर २०२२ मध्ये तिथे केलेल्या पोटनिवडणुकीमध्येही त्यांच्या सून डिंपल यादव यांना विजय मिळाला होता. (Indian Express) हे देखील वाचा- PHOTOS : सर्वात मोठ्या विजयाचा बहुमान ‘या’ उमेदवाराला; मिळाली १२ लाखांहून अधिक मतं!…

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”