-
लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच ओडिशा विधानसभा निवडणुकीचीही मतमोजणी झाली. ओडिशामध्ये भाजपला दोन्ही निवडणुकीत मोठा विजय मिळाला आहे. ओडिशामधील बिजू जनता दल या पक्षाच्या २४ वर्ष सुरू असलेल्या सत्ता केंद्राला भाजपाने यावर्षी सुरुंग लावला. यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने १४७ जागांपैकी एकूण ७८ जागांवर विजय प्राप्त केला आहे. (@Aparajita Sarangi/FB)
-
त्यामुळे ओडिशामध्ये पुढील मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा जोर धरत आहे. मुख्यमंत्री पदासाठी मुख्यतः ज्या नावावर चर्चा होत आहे त्या नावांमध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, वैजयंत पांडा, भुवनेश्वरच्या खासदार अपराजिता सारंगी, प्रताप सारंगी, गिरीश मुर्मू, संबीत पात्रा, नारायण मिश्रा आणि मनमोहन सामल यांच्या नावांचा समावेश आहे. (@Aparajita Sarangi/FB)
-
दरम्यान अपराजिता सारंगी या भुवनेश्वरमधून तिरंगी लढतीत काँग्रेस, बीजेडीच्या उमेदवारांना यांना पराभूत करून खासदार झाल्या आहेत. (@Aparajita Sarangi/FB)
-
अपराजिता सारंगी या आयएएस अधिकारी राहिलेल्या आहेत. त्यांचे पती संतोष कुमार सारंगी हे देखील आयएएस अधिकारी आहेत. अपराजिता यांची सामाजिक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही ओळख आहे. (@Aparajita Sarangi/FB)
-
बिहारच्या मुजफ्फरमध्ये अपराजिता यांचा जन्म झाला. १९९४ मध्ये यूपीएससीची परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या, तेव्हा त्या केवळ २४ वर्षांच्या होत्या. (@Aparajita Sarangi/FB)
-
अपराजिता सारंगी यांनी २०१८ मध्ये आयएएस ही नोकरी सोडून भाजपामध्ये सहभागी झाल्या. (@Aparajita Sarangi/FB)
-
त्यांनी बिहारमधील भागलपूर विद्यापीठामध्ये बीए इंग्लिश हे त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. (@Aparajita Sarangi/FB)
-
त्यांच्या संपत्तीची माहिती जर आपण बघितली तर myneta. Info या वेबसाईट नुसार अपराजिता सारंगी ४ कोटी रुपयांच्या मालक आहेत. (@Aparajita Sarangi/FB)
-
त्यांच्या विविध बँक खात्यामध्ये १ कोटी २९ लाख ८६ हजार ११० रुपये रक्कम आहे. तसेच त्यांच्याकडे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने आहेत. (@Aparajita Sarangi/FB)
-
अपराजिता सारंगी आणि त्यांचे पती यांच्या नावावर २ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. (@Aparajita Sarangi/FB)
९ फेब्रुवारी राशिभविष्य: त्रिपुष्कर योगात मेष, मीन राशींच्या सुखाचा होणार शुभारंभ; कोणाची इच्छापूर्ती तर कोणाच्या आयुष्यात होतील अनपेक्षित बदल