-
रामजन्मभूमी म्हणून ओळख असेलेला उत्तर प्रदेशमधील प्रसिद्ध मतदारसंघ अयोध्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर चर्चेत आला आहे. (@LalluSingh/FB)
-
येथे भाजपाचे उमेदवार लल्लू सिंह यांचा पराभव झाला आहे. (@LalluSingh/FB)
-
काही दिवसापूर्वीच भाजपा सरकारने अयोध्येत रामजन्मभूमी येथील राममंदिर लोकार्पण केले. त्या पार्श्वभूमीवर भाजपाला याजागेवर मोठा विजय मिळेल असं राजकीय जाणकार सांगत होते, पण ते काही खरं ठरलं नाही. (@LalluSingh/FB)
-
समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद हे ज्येष्ठ उमेदवार अयोध्येत विजयी झाले आहेत. (@awdheshprasad/FB)
-
लल्लू सिंह यांना ४ लाख ९९ हजार ७२२ मते मिळाली तर अवधेश प्रसाद यांना ५ लाख ५४ हजार २८९ मते मिळाली असून प्रसाद यांनी अवधेश यांचा ५४ हजार ५६७ मतांनी पराभव केला आहे. (@awdheshprasad/FB)
-
विशेष म्हणजे अवधेश प्रसाद यांनी बिगर राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. (@awdheshprasad/FB)
-
अवधेश हे समाजवादी पार्टीतील दलित चेहरा म्हणून ओळखले जातात. (@awdheshprasad/FB)
-
याआधी अवधेश प्रसाद तब्बल ७ वेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आहेत. (@awdheshprasad/FB)
-
उत्तर प्रदेश मधील एकूण निकालही भाजपासाठी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी चिंतनाचा विषय मानला जात आहे. (@awdheshprasad/FB)
-
अवधेश हे समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत. ते सध्या सपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सरचिटणीस आहेत (@awdheshprasad/FB)
-
(@awdheshprasad/FB) हेही पहा- PHOTOS : अनंत अंबानींच्या घडाळ्याची किंमत वाचून व्हालं थक्क; एवढचं नाही तर आहेत ‘या’ ५ सर्वात
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”