-
आंध्र प्रदेशमधील निवडणुका संपल्या आणि आज राज्याला नवा मुख्यमंत्रीही मिळाला आहे. चंद्राबाबू नायडू यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून हा त्यांचा चौथा कार्यकाळ आहे. याआधी तीन वेळा ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. (@Nara Chandrababu Naidu/FB)
-
त्यांच्यासोबत २५ इतर नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र या नेत्यांमध्ये एका नावाची सर्वाधिक चर्चा आहे. हा नेता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्यांपैकी एक आहे. (@Nara Chandrababu Naidu/FB)
-
दरम्यान, पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशच्या नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे आणि ते केवळ चंद्राबाबू नायडू यांच्याच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही आवडत्या नेत्यांपैकी एक आहेत. साऊथ सिनेसृष्टीत ‘पॉवर स्टार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पवन कल्याणचे खरे नाव कोनिडेला कल्याण बाबू आहे. तो दाक्षिणात्य मेगास्टार चिरंजीवीचा धाकटा भाऊ आहे. (@Nara Chandrababu Naidu/FB)
-
पवन कल्याण हा खूप श्रीमंत कलाकार आहे. myneta.info वेबसाइटनुसार त्यांची एकूण संपत्ती १६४ कोटी रुपये आहे. त्याचबरोबर त्याच्यावर ६५ लाख रुपयांची देणीही आहेत. (@Pawan Kalyan/FB)
-
पवन कल्याण यांच्या पत्नी आणि मुलांच्या नावावर वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये २० कोटी रुपये जमा आहेत. (@Nara Chandrababu Naidu/FB)
-
दाक्षिणात्य सुपरस्टार पवनकडे घरी २ कोटी ६५ लाख ८९ हजार ५०० रुपयांचे दागिने आहेत, त्यापैकी २.५ कोटी रुपयांचे दागिने त्याच्या नावावर आहेत. (@Nara Chandrababu Naidu/FB)
-
पवन कल्याणने विविध ठिकाणी मोठी गुंतवणूक केली आहे. त्याच्या नावावर १० कोटी रुपयांची शेतजमीन आहे. त्याचबरोबर ५२ कोटी ८५ लाख रुपयांची बिगरशेती जमीन आहे. (@Nara Chandrababu Naidu/FB)
-
पवन कल्याणकडे अनेक निवासी घरे आहेत ज्यांची सध्याची किंमत ५५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. (@Nara Chandrababu Naidu/FB)
-
शिक्षणाविषयी बोलायचे झाले तर पवन कल्याणने फक्त दहावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. (@Pawan Kalyan/FB) हेही पाहा- PHOTOS : पंतप्रधान मोदी, अमित शाहांच्या उपस्थितीत चंद्राबाबू नायडूंनी घेतली चौथ्यांदा…

असा अपघात कोणाच्याच नशिबी येऊ नये! हायवेवर ओव्हरटेक करायला गेला अन् क्षणार्धात झाला कारचा चुरा, थरारक VIDEO व्हायरल