-
लोकसभा निवडणुकीसह देशात ओडिशा, सिक्कीम, आंध्र प्रदेशमधील विधानसभा निवडणुकाही पार पडल्या. (@Mohancharanmajhee/FB)
-
यामध्ये सिक्कीम सोडता भाजपाला ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये चांगले यश मिळाले आहे. (@Mohancharanmajhee/FB)
-
एकूण १४७ विधानसभेच्या जागांपैकी भाजपाला ७८ जागांवर विजय मिळाला आहे. तर बीजेडीला ५१ जागा आणि काँग्रेसला १४ जागांवर विजय प्राप्त झाला. (@Mohancharanmajhee/FB)
-
त्यानंतर ओडिशाच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळात पडेल याकडे लक्ष्य लागलेलं असताना भाजपाकडून ओडिशाच्या मुख्यमंत्री पदासाठी मोहन माझी यांचं नाव जाहीर करण्यात आलं आणि आज त्यांचा शपथविधी पार पडला आहे. (@Mohancharanmajhee/FB)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी माझी यांच्या शपथविधीला उपस्थित होते. (@Mohancharanmajhee/FB)
-
भाजपने ओडिशातील नवीन पटनायक यांची दीर्घकालीन सता उलथवून टाकली आहे. (@Mohancharanmajhee/FB)
-
मोहन माझी हे ४ वेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. (@Mohancharanmajhee/FB)
-
याहीवेळी केओंझर मतदारसंघातून निवडून आले. त्यांनी बीजेडीच्या मीना माझी यांचा ११ हजार ५७७ मतांनी पराभव केला. (@Mohancharanmajhee/FB)
-
माझी यांचे संघटनात्मक कौशल्य उत्तम असल्याने त्यांना भाजपाने मुख्यमंत्रीपदी संधी दिली असल्याची चर्चा आहे. (@Mohancharanmajhee/FB)
-
राज्यातील आदिवासी जनतेचे नेते म्हणूनही माझी हे प्रसिद्ध आहेत. (@Mohancharanmajhee/FB)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”