-
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा आणि एनडीए आघाडीचे सरकार पुन्हा एकदा देशामध्ये अस्तित्वात आले आहे. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा वर्णी लागली. राष्टपती भवनात पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यांच्यासह एकूण ७१ मंत्र्यांनीही शपथ घेतली. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे खातेवाटपदेखील पार पडले. दरम्यान, यासर्वात मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात काही असेही चेहरे आहेत जे काही राज्यांचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात. (Narendra modi/X)
-
मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात एक दोन नव्हे तर तब्बल ६ माजी मुख्यमंत्री आहेत. (Narendra modi/X)
-
राजनाथ सिंह
मोदी सरकारच्या मागील कार्यकाळात आणि नव्या मंत्रिमंडळातही पुन्हा एकदा संरक्षण मंत्री म्हणून कार्यरत असणारे भाजपा नेते राजनाथ सिंह हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत. (Rajnath singh/X) -
मनोहरलाल खट्टर
नगर विकास खाते सांभाळणारे मनोहरलाल खट्टर हे हरीयाणा राज्याचे १० वे मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहरलाल खट्टर हे कर्नाल लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. (ML Khattar/X) -
जीतनराम मांझी
मोदी सरकारमधील सुक्ष्म लघू मध्यम उद्योग मंत्रालयाचे मंत्री असलेले जीतनराम मांझी हे बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. हिंदुस्तान आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतनराम हे बिहारचे २३ वे मुख्यमंत्री राहिले आहेत. (ANI) -
सर्बानंद सोनोवाल
मोदींच्या केंद्रीय मंत्रीमंडळात बंदर व जलवाहतूक मंत्री असलेले सर्बानंद हे आसाम राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. २०१६ सालच्या आसाम विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. २०१६ ते २०२१ पर्यंत त्यांनी आसाम राज्याचे १४ वे मुख्यमंत्री म्हणून कार्य केले आहे. -
एच.डी.कुमारस्वामी
एच.डी.कुमारस्वामी हरदनहळ्ळी देवेगौडा कुमारस्वामी हे २००६ ते २००७ दरम्यान कर्नाटकचे १८ वे मुख्यमंत्री होते. हे कर्नाटक जनता दलचे अध्यक्ष आहेत. (ANI) -
शिवराज सिंह चौहान
मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदावर संधी न मिळालेले शिवराज हे आता मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात कृषीमंत्री म्हणून कार्यरत झाले आहेत. त्यांनी याआधी तब्बल चार मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचा कारभार पाहिला आहे. (Shivraj Singh Chauhan/X) -
(Narendra modi/X) हेही पहा- PHOTOS : गंगा दसऱ्यानिमित्त हरिद्वार, प्रयागराज, बनारस, पाटणा येथील घाटांवर लाखो भाविकांची गर्दी! पहा फोटो

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”