-
देशातील प्रत्येक नागरिकासाठी मतदार ओळखपत्र हा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. तुम्ही जेव्हा मतदान करण्यासाठी जाता तेव्हा तुमची ओळख पडताळून करण्यासाठी मतदार ओळखपत्राचा वापर केला जातो.
-
पण फक्त मतदान करण्यासाठीच नाही तर भारताचा नागरिक म्हणून तुमच्याकडे मतदान ओळखपत्र असणे गरजेचे आहे. कारण काही शासकीय कागदपत्र काढण्यासाठी देखील अनेकदा मतदान ओळखपत्राची गरज भासते.
-
पण तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या मतदार ओळखपत्राशी लिंक करता तेव्हा तुमच्यासाठी व्होटिंग कार्डशी संबंधित माहिती ऑनलाइन अपडेट करणे खूप सोपे होते.
-
त्यामुळे मतदार ओळखपत्राला मोबाईल नंबर कशाप्रकारे लिंक करायचा याबाबत काही सोप्या स्टेप्स तुम्हाला सांगणार आहोत.
-
१) सर्वप्रथम ऑफिशियल नॅशनल वोटर्स सर्व्हिस वेबसाईटवर https://www.nvsp.in वर जा.
-
२) आता या वेबसाईटवर मोबाईल नंबर, ईमेल, पासवर्ड व कॅप्चा कोड भरून लॉग इन करा.
-
३) तुम्ही नवीन युजर असाल, तर साइन अप करा. त्यासाठी मोबाईल नंबर, ईमेल व कॅप्चा कोड टाकल्यानंतर पुढे जा.
-
४) तुमच्या दिलेल्या मोबाईल नंबरवर ‘वन टाइम पासवर्ड’ प्राप्त करण्यासाठी ‘रिक्वेस्ट ओटीपी’वर क्लिक करा.
-
५) मोबाईल नंबरवर मिळालेला ओटीपी टाका. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल.
-
६) तुमच्या मतदान ओळखपत्रात तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी तुम्हाला होमपेजवर फॉर्म 8 वर क्लिक करावे लागेल.
-
७) त्यानंतर ‘सेल्फ’ सिलेक्ट करा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा. मग Other ऑप्शनवर सिलेक्ट करून Epic भरा आणि सबमिट करा.
-
८) पुढील स्क्रीनवर तुम्हाला मतदाराचे तपशील दिसतील. त्यानंतर ‘ओके’वर क्लिक करा. मग दुसऱ्या क्रमांकावर दिलेला करेक्शन पर्याय निवडा.
-
१०) यानंतर प्लेस भराआणि कॅप्चा कोडदेखील टाका. मग ‘सेंड ओटीपी’ बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला OTP भरा आणि फॉर्म डिटेल्स एकदा नीट वाचून घ्या. मग ‘सबमिट’वर क्लिक करा.
-
११) आता ४८ तासांनंतर तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या मतदार ओळखपत्राशी लिंक केला जाईल. (फोटो – Freepik, Jansatta, Indian Express, File Photo)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”