-
महाराष्ट्र विधानसभा २०२४ साठी आज मतदान होत आहे.
-
महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघासाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे.
-
सकाळपासून राज्यातील राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
-
यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कुटुंबासह मतदान केले आहे.
-
-
राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा (माहिम मतदार संघातील मनसेचे उमेदवार) अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे आणि मुलगी उर्वशी ठाकरे यांच्यासह दादरच्या शिवाजी पार्कमधील बालमोहन विद्यामंदिरात आपला मतदानाचा हक्क बजावला.
-
यावेळी राज ठाकरे यांची आई कुंदा ठाकरे देखील मतदान करण्यासाठी कारमधून मतदान केंद्रावर पोहोचल्या.
-
राज ठाकरे यांची आई कुंदा ठाकरे यांनी मतदान करुन बाहेर आल्यानंतर हात उंचावून बोटावरील शाही दाखवली.
-
राज ठाकरे यांच्या कुटुंबातील सहा जणांनी संपूर्ण मतदान प्रक्रियेचं पालन करुन मतदान केलं.
-
यानंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी मतदारांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले.
-
यावेळी मुलगा अमित ठाकरे यांना मतदान करुन कसे वाटले या माध्यमांच्या प्रश्नावरही राज ठाकरे यांनी उत्तर दिले
-
मी आजवर अनेकदा मतदान केले आहे. आजही मतदान केले, मतदान करुन नेहमीच चांगलं वाटतं असं राज ठाकरे म्हणाले.
-
मतदार मोठ्या संख्येने येत आहेत, युवा वर्ग मतदानाला बाहेर पडतोय, त्यावर ‘मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे’ असं राज ठाकरे म्हणाले.
-
दरम्यान मतदान केंद्राबाहेर उभ्या असलेल्या अनेक मतदारांनी अमित ठाकरेंसह सेल्फी घेतला.
-
दरम्यान मतदान करण्यासाठी जाण्यापूर्वी मनसे उमेदवार अमित ठाकरे यांनी सकाळी सर्वप्रथम सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले.
-
मतदान केंद्रावर अमित ठाकरे त्यांची पत्नी मिताली ठाकरे आणि बहिण उर्वशी ठाकरे यांनी मतदानानंतर बोटावरील शाही दाखवत फोटोही काढले. (फोटो साभार – Pradip Das | Express photo )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”