-
महाराष्ट्र विधानसभेच्या मतमोजणीला शनिवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.
-
आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार महायुतीची घसघशीत आघाडी असल्याचे दिसून येते.
-
लाडकी बहीण योजना हे या आघाडीचे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
विरुद्ध पक्षांचे नेते या योजनेवर विविध प्रकारची टीका करताना दिसले आहेत.
-
बटेंगे तो कटेंगे- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बांगलादेशमध्ये झालेल्या हिंदूंच्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला होता. परंतु, राष्ट्रवादीचे अजित पवार आणि भाजपच्या काही नेत्यांनी याला विरोध केला.
-
एक है तो सेफ है- निवडणुका तोंडावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात अनेक सभा केल्या. या प्रचारात त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यामध्ये सुधारणा करत एक है तो सेफ है, असा नारा दिला होता आणि याच नाऱ्यामुळे हिंदूंची मते अधिक असल्याचे दिसत आहे.
-
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना इंटर्नशिप योजना- युवा बेरोजगारांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मागच्या वर्षी अर्थसंकल्पात ही योजना आणली.
-
या योजनेसाठी सरकारने ५,५०० कोटींची तरतूद केली. या योजनेत बारावी पास उमेदवारास महिन्याला सहा हजार, आयटीआय उमेदवारास आठ हजार आणि पदवीधर उमेदवारास १० हजार रुपये दिले. या योजनेमुळे युवकांचा कल महायुतीकडे जाण्याची दाट शक्यता दिसून येते.
-
या सर्व योजनांचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता नाकारता येत नाही .
(सर्व फोटो सौजन्य ; इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता )