-
राष्ट्रीय राजधानीतील ७० विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले असून ५७.७७ टक्के इतके मतदान झाले आहे. (एक्सप्रेस फोटो: ताशी तोबग्याल)
-
मतदारांची मतदानाची टक्केवारी निर्णायक भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ६२.५९ टक्के होती. (एक्सप्रेस फोटो: ताशी तोबग्याल)
-
नवी दिल्ली मतदारसंघात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (आप), भाजप खासदार परवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांच्यात स्पर्धा होत आहे. अरविंद केजरीवाल चौथ्यांदा मुख्यमंत्री होणार का? याबद्दल उत्सुकता आहे. (एक्सप्रेस फोटो – अमित मेहरा)
-
बुधवारी ईशान्य दिल्लीत सर्वाधिक ६३.८३ टक्के तर दक्षिण पूर्व दिल्लीत सर्वात कमी ५३.७७ टक्के इतके मतदान झाले. (एक्सप्रेस फोटो: ताशी तोबग्याल)
-
मागच्या तीन विधानसभा निवडणुकांची तुलना केली तर यावेळी कमी मतदान झाले आहे. (एक्स्प्रेस फोटो ताशी तोबग्याल)
-
मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल्सचे अंदाज समोर आले आहेत. १० पैकी ८ एक्झिट पोल्सनी भाजपाच्या बाजूने कौल दिला आहे. (एक्सप्रेस फोटो – प्रवीण खन्ना)
-
दिल्ली विधानसभेसाठी राहुल गांधी यांनीही आज मतदान केले. एक्झिट पोल्समध्ये दिल्लीसाठी फारसे आशायदायक चित्र दिसले नाही.
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातील मतदान केंद्रावर मतदानाचे कर्तव्य पार पाडले. (पीटीआय फोटो)
-
दिल्ली विधानसभेत एकूण ७० जागा असून बहुमताचा आकडा ३६ एवढा आहे. एक्झिट पोल्सनुसार भाजपाला सरासरी ४५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (पीटीआय फोटो)
-
दिल्लीत मतदान केल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या शाई लावलेल्या बोटांना दाखवले. (पीटीआय फोटो)
-
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी तुघलक क्रेसेंट परिसरातील मतदान केंद्रावर मतदान केले. (पीटीआय फोटो)
-
मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी त्यांच्या बोटावरी शाई दाखवली. (पीटीआय फोटो)
-
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि मुलगा रायहान यांच्यासह लोधी इस्टेट येथे मतदान केले. (पीटीआय फोटो)
११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य