-
आज लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.
-
भारतीय जनता पक्षासह इतर पक्षांनीही या लोकसभा निवडणुकीत अनेक कलाकरांना संधी दिली. यामध्ये या कलाकारांचा निकाल काय लागला याबद्दल जाणून घेऊयात.
-
कंगना राणावत
बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी झाली आहे. -
निरहुआ
आझमगड मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निरहुआ पुन्हा एकदा नशीब आजमावत असताना अपयशी झाले आहेत. -
शत्रुघ्न सिन्हा
शत्रुघ्न सिन्हा हे टीएमसीच्या वतीने पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. त्यांना यामध्ये विजय मिळाला आहे. -
हेमा मालिनी
हेमा मालिनी मथुरा मतदारसंघातून भाजपकडून तिसऱ्यांदा नशीब आजमावत असताना त्यांना यश मिळालं आहे. -
रवी किशन
भोजपुरी स्टार रवी किशन यांनी २०१४ मध्ये काँग्रेसच्या जौनपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती; पण त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये रवी किशन यांनी गोरखपूरमधून भाजपाच्या जागेवरून निवडणूक लढवली आणि त्यांच्या स्टारडममुळे ते जिंकले. यावेळी ते पुन्हा एकदा या जागेवरून यशस्वी झाले आहेत. -
मनोज तिवारी
ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारी यांनी भाजपाकडून निवडणूक लढवली असून, त्यांची लढत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमारशी झाली. यामध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. -
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख