-
देशामध्ये काल ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवण्याचा बहुमान भाजपाच्या उमेदवारांना मिळाला आहे. तर एका काँग्रेस उमेदवाराचाही यात समावेश आहे.
-
ज्यामध्ये शंकर ललवाणी इंदोर मतदारसंघातील उमेदवार यांचा पहिला क्रमांक लागतो. यांनी ११ लाख ७२ हजार मते मिळवली.
-
गुजरात मधील नवसारी मतदारसंघांमध्ये मागील तीन खेपेला सलग निवडून आलेले सी आर पाटील यांनी याही वेळेस मोठे मताधिक्य मिळवलं. त्यांनी देशमधील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहेत. ७ लाख ६७ हजार इतकी मते मिळवली.
-
गुजरातमधील गांधीनगर या मतदारसंघातून उभे असलेले गृहमंत्री अमित शहा यांना ७ लाख ३७ हजार मते मिळाली.
-
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनीही ७ लाख ९६ हजार मते मिळवून मोठा विजय प्राप्त केला.
-
काँग्रेसचे उमेदवार रकिबुल हुसेन यांना ढुबरी आसाम मधील मतदारसंघात ७ लाख ३६ हजार इतक्या मताधिक्क्याने विजय मिळाला आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मतांची टक्केवारी यावेळेस घसरली आहे. वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवत असलेले पंतप्रधान मोदी यांना यावेळेस १ लाख ५२ हजार ५१३ मतांनी विजय मिळाला आहे.
-
२०१४ मध्ये काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात मोठ्या मताधिक्याने म्हणजेच ४ लाख ७९ हजार मताधिक्यांनी पंतप्रधान मोदींना विजय मिळाला होता.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख