-
Breaking News : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 will held on 20 November 2024 आज अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे.
-
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे.
-
२० नोव्हेंबर २०२४ मतदान होणार आहे. तर मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे.
-
त्यामुळे आता महाराष्ट्रात सर्वत्र निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळणार आहे.
-
दरम्यान, निवडणूक प्रक्रिया चांगल्या प्रकारे पार पडावी म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने काही कठोर आदेशही दिले आहेत. त्याबद्दल आपण जाणून घेऊयात
-
१. ८५ वर्षांवरील नागरिकांचे मतदान घरातूनच करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-
२. ज्येष्ठ नागरिकांचे मतदान घेताना व्हिडीओग्राफी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
-
३. निवडणुकीतील प्रत्येक प्रक्रियेची व्हिडीओग्राफी करण्यात येणार.
-
४. व्होटर हेल्पलाईन अॅपमध्ये मतदारांची सर्व माहिती दिसणार.
-
उमेदवारांसाठीही काही आदेश
५. उमेदवारांनी तीनवेळा गुन्ह्यांची माहिती द्यावी असं मांडण्यात आलं आहे. -
६. निष्पक्ष आणि स्वतंत्र मतदान प्रक्रिया होणार
-
७. मतदारांना प्रलोभन दाखवणाऱ्यांवर नजर ठेवली जाणार.
-
८. प्रत्येक विमान, हेलिकॉप्टरची तपासणी होणार.
-
९. बॉर्डरवरील चेक पोस्टवर कडक तपासणी होणार.
-
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक
हेही पाहा – मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी, रात्री १२ पासून सुरु झाली अमंबजावणी

महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली