-
राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान उद्या (२० नोव्हेंबर) पार पडणार आहे.
-
२८८ मतदारसंघांमधील उमेदवारांचे भवितव्य उद्या मतपेट्यांमध्ये कैद होईल.
-
दरम्यान, यंदाची राज्यातील निवडणूक जास्त रंगतदार आहे. त्यामागील कारण म्हणजे महायुती आणि महविकास आघाडीतील लक्षवेधी जागावाटप. याशिवाय अपक्ष उमेदवारही मोठ्या संख्येने निवडणूक रिंगणात आहेत.
-
तसेच मनसे, वंचित आणि परिवर्तन महाशक्ती आघाडीही निवडणूक लढवत आहे त्यामुळे यंदाच्या निकालात काय घडणार याबद्दल नागरिकांमध्ये खूप उत्सुकता आहे.
-
दरम्यान या निवडणुकीच्या आखाड्यात कोणत्या पक्षाचे किती उमेदवार करोडपती आहेत, याबद्दल आपण जाणून घेऊयात.
-
यंदा महायुतीतील भारतीय जनता पार्टी १४९ जागा लढवत आहे. या १४९ उमेदवारांपैकी १४४ उमेदवार करोडपती आहेत.
-
शिंदेंची शिवसेना यंदा ८१ जागा लढवत आहे. ८१ उमेदवरांपैकी ७९ उमेदवार करोडपती आहेत.
-
अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ५९ उमेदवार घेऊन या निवडणुकीत उतरली आहे. एकूण ५८ उमेदवार करोडपती आहेत.
-
महविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष यंदा १०१ जागा लढवत आहे. काँग्रेसच्या १०१ उमेदवारांपैकी ९४ उमेदवार करोडपती आहेत.
-
ठाकरेंची शिवसेना यंदा ९५ जागा लढवत आहे. शिवसेनेच्या ९५ उमेदवारांपैकी ९४ करोडपती आहेत.
-
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ८४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यामधील ८० उमेदवार करोडपती आहेत.
-
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
हेही पाहा – Photos : मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे पोहोचली कामाख्या देवीच्या दर्शनाला, आसाममधील सफरीचे फोटो व्हायरल
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”