-
सावंतवाडी जिल्ह्यातून मंत्री दीपक केसरकर यांचा विजय झाला आहे.
-
सावंतवाडी मतदारसंघामधून दीपक केसरकर विरुद्ध राजन तेली अशी लढत होती.
-
शिवसेनेतील फुटीनंतर केसरकरांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली.
-
राजन तेली शिव सेने (उ.बा.टा ) यांच्या पक्षातील असून उद्धव ठाकरेंनी मजबूत खेळाडूला मैदानात उतरवायचे म्हणून राजन तेली यांना तिकीट दिले.
-
राजन तेलींनी दीपक केसरकारांकडून २०१९च्या निवडणुकीत पराभव पत्करला होता.
-
राजन तेली यांनी निवडणुकीच्या १ महिन्यापूर्वी भाजपचा पक्ष सोडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.
-
याचे कारण नितीश राणे आणि त्यांच्या कुटुंबाचे चालणारे एकतर्फी राजकारण असे तेलींनी सांगितले.
-
२०१९च्या निवडणुकीत दीपक केसरकर शिवसेनेकडून तर राजन तेली भाजपकडून लढत होते.
-
त्या निवडणुकीत दीपक केसरकरांनी राजन तेली यांना १३ हजार २८८ मतांनी हरविले होते.
-
यंदाच्या निवडणुकीत दीपक केसरकरांनी राजन तेली यांना तब्बल ३९ हजार ८९९ मतांनी हरविले.
(सर्व फोटो सौजन्य ; दीपक केसरकर, राजन तेली, नारायण राणे/ इंस्टाग्राम )