-
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचा बहुप्रतिक्षित 'प्रेम रतन धन पायो' चित्रपट दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 'प्रेम' नावाच्या भूमिकांशी सलमानचे अगदी जवळचे नाते राहिले आहे. सलमानने आजवर विविध चित्रपटांमधून तब्बल १४ वेळा प्रेम नावाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटातून सलमान यंदा पुन्हा एकदा 'प्रेम'च्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
-
‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित नुकतेच प्रदर्शित झाले. या पोस्टरमध्ये सलमान खान आणि सोनम कपूर राजश्री बॅनरची खासियत असलेल्या टिपिकल रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.
-
चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी टीपलेले हे छायाचित्र फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांनी शेअर केला आहे. सलमान एखादा विनोद सोनम, अविनाश गोवारीकर आणि दिग्दर्शक सुरज बडजात्या यांच्यासोबत शेअर करताना या छायाचित्रात दिसत आहे.
-
चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी टीपलेले छायाचित्र.
-
सलमान, सोनम यांच्यासह या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटाचे डबिंग होत असताना अनुपम खेर यांनी शेअर केलेले छायाचित्र.
-
चित्रपटाचे साऊंड डबिंग पूर्ण झाल्यानंतर अभिनेते अनुपम खेर यांनी साऊंड डिझाईनर रफीक आणि जितेंद्र चौधरी यांनी दिलेल्या सल्ल्यांबद्दल ट्विटवर आभार व्यक्त केले.

DC vs MI: रोहित शर्माचा एक निर्णय अन् नवा चेंडू ठरला सामन्याचा टर्निंग पॉईंट, डगआऊटमधून हिटमॅन कसा ठरला गेमचेंजर?