-
बॉलीवूडचा दबंग सलमान खान यंदा 'बिग बॉस'च्या नवव्या पर्वातून 'डबल ट्रबल' घेऊन आला आहे. आगामी सुलतानच्या भूमिकेसाठी तयारी करत असलेला सलमान त्याच्या नव्या लूकमध्ये दिसला. यावेळी त्याने 'मै हूँ हिरो तेरा' या गाण्यावर सादरीकरणदेखील केले.
जय हो चित्रपटातून सलमानसोबत झळकलेल्या डेसी शाहाने शोच्या पहिल्या दिवशी नृत्य सादर केले. सलमानने 'बिग बॉस ७'ची स्पर्धक एली अवराम हिच्यासहदेखील नृत्य केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सलमानने सर्व प्रेक्षकांचे स्वागत करून स्पर्धकांना त्यांच्यासाठी जोडीदार निवडण्यास सांगितले. 'गोलमाल', 'धूम', 'हंगामा' या चित्रपटांमध्ये झळकलेली रिमी सेन बिग बॉसच्या या पर्वातील स्पर्धक आहे. रिमीला स्प्लिट्स विलाचा विजेता प्रिन्स नरुला आणि टीव्ही कलाकार सुयश राय यांच्यामध्ये जोडीदावर निवडण्यास सांगितलेले होते. टीव्ही अभिनेत्री रुपल त्यागी आणि डियांग्ना सुर्यवंशी या पर्वात एकमेकींच्या जोडीदार असतील. इराणी मॉडेल आणि अभिनेत्री मंदाना करिमी हिने जोडीदार म्हणून अभिनेता केथची निवड केली. तिच्यासमोर अंकित अरोराचाही पर्याय होता. यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'भाग जॉनी' या चित्रपटाने मंदानाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. रुपल त्यागीचा पूर्वाश्रमीचा प्रियकर अंकित गेरा याची जोडी गायक अरविंद वेग्दा याच्यासह जमली. प्रिन्स नरुला यास डावलून अभिनेत्री युविका चौधरी हिने बिग बॉसमध्ये विकास भल्ला याची जोडीदार म्हणून निवड केली.
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल