-
बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री सोनम कपूर सध्या 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.
-
'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटातून सलमान तब्बल १५ वर्षांनंतर प्रेम नावाची भूमिका पुन्हा एकदा साकारणार आहे. (छाया- वरिन्दर चावला)
-
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनम कपूर आणि सलमान अहमदाबादसाठी रवाना झाले.(छाया- वरिन्दर चावला)
-
'प्रेम रतन धन पायो'चा ट्रेलर आणि पोस्टर्समधील लूकने सोनमने देखील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे सलमानसह सोनमच्याही चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. (छाया-वरिन्दर चावला)
-
सलमान सध्या 'बिग बॉस-९' या टेलिव्हिजन रिआलिटी शो मध्येही व्यस्त आहे. त्यामुळे बीग बॉस-९ चे चित्रीकरण सांभाळून चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देखील वेळ देत आहे. (छाया- वरिन्दर चावला)
-
यंदाच्या दिवाळीत १२ नोव्हेंबरला 'प्रेम रतन धन पायो' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (छाया- वरिन्दर चावला)
-
'प्रेम रतन धन पायो' चित्रपटाचे 'जलते दिये' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. त्यास चाहत्यांची चांगली पसंती देखील मिळत आहे. (छाया- वरिन्दर चावला)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”