-
नारायण राणे, रामदास आठवले आणि नितीन सरदेसाई, तीन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे हे नेते आपल्या रोखठोक भूमिकेमुळे कायम चर्चेत राहतात. असे हे तीन दिग्गज नेते प्रथमच एखाद्या मनोरंजक कार्यक्रमात एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात हे नेते सहभागी होणार आहेत.
-
येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच २३ आणि २४ नोव्हेंबरला रात्री ९.३० वा झी मराठीवरून हे विशेष भाग प्रसारित होणार आहेत.
-
आजवर सिनेक्षेत्राशी संबंधित व्यक्तिंना भेटण्याची त्यांना जाणून घेण्याची संधी या कार्यक्रमातून प्रेक्षकांना मिळाली पण आता प्रथमच या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत राजकीय पटलावरील काही मान्यवर व्यक्तिमत्व.
-
येत्या सोमवारी आणि मंगळवारी प्रसारित होणा-या भागात नारायण राणे, रामदास आठवले आणि नितीन सरदेसाई या राजकीय नेत्यांचे काही नवे पैलू ‘चला हवा येऊ द्या’ मधून बघायला मिळणार आहेत.
खुमासदार राजकीय वक्तव्यांसोबतच आपल्या खुसखुशीत आणि उत्स्फुर्त राजकीय कवितांसाठी प्रसिद्ध असलेल्या आठवले यांनी शोलेतील गब्बरच्या भूमिकेचं एक प्रहसन रंगवलं शिवाय काही कविताही सादर केल्या. आजच मी पाहिलेलं आहे तुमचं गाव मीच जिंकणार आहे आजचा डाव आपल्या दुश्मनावर घालणार आहे मी घाव कारण आठवले आहे माझं नाव अशी कविता सादर करताच उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.
Pune Swargate Rape Case : “तो माझ्या संपर्कातील मैत्रिणींचे…”, पुणे बलात्कार प्ररकरणातील आरोपीबाबत मैत्रिणीकडून मोठी माहिती; म्हणाली…