-
प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली आणि आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही जोडी त्यांच्या चाहत्यांसाठी कायम चर्चेचा विषय असते. अनेकवेळा विराट आणि अनुष्का एकत्र अढळून आले आहेत. नुकतेच दोघांचे मुंबई विमानतळावर एकत्र दर्शन झाले. लगेज बॅगसह विमानतळाबाहेर पडणाऱ्या विराटच्या पाठीमागून अनुष्कादेखील चालत होती. (छाया – वरिंदर चावला)
-
विमानतळावर उपस्थित असलेल्या माध्यमांच्या कॅमेऱ्याला चुकविण्याचा विराटने खूप प्रयत्न केला, परंतु, माध्यमांच्या कॅमेऱ्याने त्याला नेमकेपणाने टिपले. परिणामी विराट पुन्हा एकदा अनुष्कासोबत कॅमेऱ्यात कैद झाला. सुटकेसचा सहारा घेत त्याने आपला चेहरा लपविण्याचा प्रयत्न केला, परंतु, त्याचा हा प्रयत्न व्यर्थ ठरला. (छाया – वरिंदर चावला)
-
उपस्थितांच्या नजरा अनुष्काच्या पेहरावावर खिळल्या होत्या. तिने काळ्या रंगाचा लांब शर्ट, ब्लू डेनिम, पांढऱ्या रंगाचे शूज आणि डोळ्यावर काळा गॉगल घातला होता. (छाया – वरिंदर चावला)
-
थोड्यावेळाने विमानतळावर 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षितचे आगमन झाल्याने उपस्थितांचा आनंद द्विगुणीत झाला. (छाया – वरिंदर चावला)
-
कॅजुअल लूकमधल्या माधुरीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता, ज्यात तिचे सौंदर्य खुलून दिसत होते. (छाया – वरिंदर चावला)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार