-
महाराष्ट्रातील घराघरात रात्री आठच्या ठोक्याला न चुकता बघितली जाणारी लोकप्रिय मालिका ‘होणार सून मी ह्या घरची’ या वर्षाअखेर बंद होणार आहे.
-
ही मालिका बंद होऊन दश्मी प्रॉडक्शनची नवी मालिका सुरु करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
-
‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मालिका या वर्षाअखेर किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला सर्व प्रेक्षकांचा निरोप घेईल.
-
न्हवी-श्रीच्या बाळाचे आगमन शेवटच्या भागांमध्ये प्रेक्षकांना पाहता येईल.
-
गेले अडीच वर्ष चालत आलेल्या या मालिकेने मराठी कुटुंबातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले.
-
जान्हवी आणि तिच्या सहा सासवांमुळे घराघरातील सासू-सुनेच्या नात्यात गोड बदल झाले.
-
जान्हवीचा ‘काहीही हां श्री’ संवाद, तिचे बाळंतपण याविषयीचे भन्नाट विनोद सोशल मिडियावर बरेच गाजले.
-
या मालिकेच्या वर्षपूर्तीला सेटवर सत्यानारायणाची पूजा घालण्यात आली होती. त्यावेळची काही क्षणचित्रे
-
-
-
-
-
-
-
-
-
-

१९ वर्षीय भाचा मामीला घेऊन पळाला, संतापलेल्या मामाने मोठ्या बहिणीला संपवलं