-
यशराज फिल्म्सच्या आगामी 'सुलतान'मध्ये अभिनेता सलमान खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी सलमान खान सध्या जीममध्ये विशेष मेहनत घेत आहे. चित्रपटामध्ये तो मल्लाच्या भूमिकेत दिसणार आहे. सुलतानच्या दिग्दर्शकाने सलमान खानचे काही फोटो शेअर केले आहेत. (स्रोत – ट्विटर अकाऊंट)
-
'सुलतान'मध्ये अनुष्का शर्माही सलमानसोबत दिसणार आहे. नुकतीच तिने सलमान खानची जीममध्ये भेट घेतली. त्यावेळचा एक फोटो तिने शेअर केला आहे. (स्रोत – ट्विटर अकाऊंट)
-
'सुलतान'च्या फर्स्ट लूकची त्याचे चाहते खूप दिवसांपासून वाट बघत आहेत. सध्या तरी त्यांना फोटोंवरच समाधान मानावे लागणार आहे. (स्रोत – ट्विटर अकाऊंट)
-
या भूमिकेसाठी सलमान खानने कुस्तीची विशेष प्रशिक्षण घेतले. (स्रोत – ट्विटर अकाऊंट)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”