-
इंडियन फिल्म स्टुडियोज निर्मित 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी' सिनेमाची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. आशिष वाघ आणि उत्पल आचार्य या जोडगोळीच्या निर्मितीचा 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी' हा आणखी एक सिनेमा येत्या शिवजयंतीला १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
-
आशिष वाघ दिग्दर्शक आणि निर्माता अशी दुहेरी भूमिका बजावत आहेत. दिग्दर्शक म्हणून आशिष यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. अभिनेता वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी पुन्हा एकदा नव्याने या सिनेमाच्या निमित्ताने पहायला मिळणार आहे.
अभिनेता मोहन जोशी, प्रदीप वेलणकर, विजय आंदळकर, उमा सरदेशमुख, उदय नेने, सुमुखी पेंडसे, प्रसाद जवादे, अनुजा साठे, कांचन पगारे यांच्याही भूमिका वाखाणण्या सारख्या आहेत. मॉरिशियसारख्या नयनरम्य ठिकाणी तसेच मुंबई, कोल्हापूर येथे चित्रीकरण झालेल्या या सिनेमाची गाणी तितकीच धमाकेदार आहेत. सिनेमाचं टायटल साँग रोहित राऊत याने गायलं असून ओमकार मंगेश दत्त याने लिहिलं आहे. या गाण्याचे मूळ संगीत व्ही. हरी कृष्ण यांनी दिले असले तरी त्याला पंकज पडघन यांनी आपला मराठमोळा तडका दिला आहे. मिस्टर अँड मिसेस सदाचारी चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चवेळचे छायाचित्र. मिस्टर अँड मिसेस सदाचारी चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चवेळचे छायाचित्र. सिनेमाची जान असलेलं छत्रपती शिवाजी महाराज यांची स्तुती असलेलं जगदंब हे गाणं याप्रसंगी पहिल्यांदाच दाखवण्यात आलं. अत्यंत वेगळ्या पद्धतीने चित्रीकरण करण्यात आलेल्या या गाण्यात २०० नृत्य कलाकारांसोबत वैभव प्रेक्षकांना डॅशिंग लूक मध्ये दिसणार आहे. रोमॅंटिक,कॉमेडी आणि अॅक्शनचा उत्तम मेळ असलेला हा सिनेमा आहे. स्वतःचं प्रेम जिंकण्यासाठी केलेला संघर्ष, वडील आणि मुलाचे नाते, आयुष्यातील मित्रांचे स्थान यावर आधारित सिनेमाची कथा आहे. मिस्टर अँड मिसेस सदाचारी चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चवेळचे छायाचित्र. मिस्टर अँड मिसेस सदाचारी चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चवेळचे छायाचित्र. मिस्टर अँड मिसेस सदाचारी चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चवेळचे छायाचित्र. मिस्टर अँड मिसेस सदाचारी चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चवेळचे छायाचित्र. मिस्टर अँड मिसेस सदाचारी चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चवेळचे छायाचित्र.

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल