-
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि सलमान खान यांच्यातील जिव्हाळ्याच्या संबंधाची चर्चा बोलिवूडमध्ये रंगत असे, परंतु २०१० साली या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला.
-
सलमानचे प्रेमसंबंध रोमानियन अभिनेत्री लुलिया वेन्तुरसोबत असल्याची चर्चा अलिकडच्या काळात रंगलेली पाहायला मिळाली
-
-
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या लग्नाची चर्चा हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. असे असले तीर सलमानने या विषयावर बोलणे टाळले आहे. संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ अशा अनेक अभिनेत्रींबरोबर त्याचे नाव जोडले गेले आहे.
-
जर्मन मॉडेल क्लाउडिया सिसला, झरीन खान, महेक चहल आणि हॅझेल कीच यांच्याबरोबरदेखील सलमानचे नाव जोडले गेले आहे
-
एश्वर्यासारखी दिसणाऱ्या स्नेहा उल्लामध्ये सलमानला आपले प्रेम दिसल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. 'लकी : नो टाईम फॉर लव्ह' या चित्रपटात एकत्र काम केलेल्या या दोघांची जवळीक फार काळ टिकू शकली नाही.
-
नव्वदच्या दशकात सलमानचे संगीता बिजलानीशी सुत जुळले होते.
-
सलमान खानने पाकिस्तानी अभिनेत्री सोमी अली सोबत डेटिंग केल्याचीही चर्चा होती.
भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल