-
फिल्मफेअरची ब्लॅक लेडी जिंकावी असं स्वप्न सिनेसृष्टीतकाम करणाऱ्याप्रत्येक कलाकाराचं असतं.भारतीय सिनेसृष्टीत मानाचे असे समजले जाणारे फिल्मफेअर अवार्ड्स आता मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांना गौरवणार आहे. पहिल्यावहिल्या मराठी फिल्मफेअर अवार्ड्सचे प्रक्षेपण कलर्स मराठीवर २८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता होणार आहे.
-
‘डॉ प्रकाश बाबा आमटे – अ रियल हिरो’सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला तर अभिनेत्री सोनाली कुळकर्णी आणि अभिनेता नाना पाटेकर यांनी याच सिनेमास्ठी अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला.
-
पहिल्या-वहिल्या मराठी फिल्मफेअर अवार्ड्सला विद्या बालन, वरुण धवन, तब्बू या सारख्या बॉलीवूड कलाकारांनी उपस्थिती लावली.
-
मकरंद अनासपुरे, अतुल तोडणकर, आदि कलाकारांनी देखील फिल्मफेअर अवार्ड्समध्ये आपल्या विनोदाने रंग भरले.
-
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव हे पाहिल्या वहिल्या मराठी फिल्मफेअर अवॉर्डच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले.
-
सोनाली कुळकर्णी, अमृता खानविलकर आणि नेहा पेंडसे या अभिनेत्रींनी देखील त्यांच्या नृत्याविष्काराने सर्वांची मनं जिंकली.
-
अभिनेता आदिनाथ कोठारे याचा लेझर अॅक्ट चर्चेचा विषय ठरला.
-
ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्यानृत्य आणि गाण्याच्या कार्यक्रमाने पहिल्यावहिल्या मराठी फिल्मफेअर अवार्ड्सच्या मंचाची शान वाढवली.
-
अभिनेत्री मानसी नाईक ने सादर केलेली फ्युजन लावणी विशेषलक्षवेधी ठरली.
-
-
मृणाल दुसानिस
-
अभिनेता शरद केळकर आणि त्याची पत्नी.
-
वैशाली सामंत यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
-
सोनाली खरे
-
वर्ल्डवाईड मिडियाचे सीईओ दीपक लांबा, म्हणाले, “भारतीयसिनेमाचे ‘ऑस्कर’ म्हणूनफिल्मफेअर अवार्ड्स ओळखले जातात. मराठी सिनेसृष्टी १९१२ पासून भारतीय सिनेमाचा अविभाज्य भाग आहे आणि म्हणूनच मराठी फिल्मफेअर करतांना आम्हाला अभिमान वाटतो. पहिले मराठी फिल्मफेअर कलर्स मराठी वाहिनीसोबत होत असल्याने आम्ही आनंदी आहोत.”
-
क्रांती रेडकर आणि भारत जाधव यांच्या जुगलबंदीत हास्यमैफिल रंगली.
-
अभिनेता रितेश देशमुख
-
-
नृत्य सादर करताना अभिनेत्री अमृता खानविलकर
-
मानसी नाईक
-
सोनाली कुलकर्णी
-
फिल्मफेअर अवार्ड्सविषयी बोलतांना कलर्स मराठीचे प्रमुख अनुज पोद्दार, म्हणाले, “मराठी सिनेसृष्टी दिवसागणिक व्यापक होत चालली आहे. मराठी सिनेसृष्टीच्या या प्रगतीच्या प्रवासात कलर्स मराठी एकखंबीर आधारस्तंभ बनून कायमच सोबत करेल. फिल्मफेअर अवार्ड्स मराठीत होणे ही गौरवाची बाब आहे आणि या भाग्याच्या क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान कलर्स मराठीला मिळाला याचा आम्हाला आनंद आहे.”
-
आदिनाथ कोठारे

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…