-
बॉलिवूडची ‘हॉट जोडी’ आलिया भट आणि सिध्दार्थ मल्होत्राने वोग इंडिया फॅशन मासिकासाठी एकत्र फोटोशूट केले. वोग मासिकाच्या मुखपृष्ठावर आलिया आणि सिध्दार्थ एकत्र दिसत आहेत. (सौजन्य – Vogue India)
-
या फोटो शूटचा एक व्हिडिओदेखील प्रसिध्द करण्यात आला आहे. ज्यात आलिया आणि सिध्दार्थची लक्षवेधी केमिस्ट्री पाहायला मिळते. (सौजन्य – Vogue India)
-
पुढील महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या ‘कपूर अॅण्ड सन्स’मध्ये ही हॉट जोडी नजरेस पडेल. (सौजन्य – Vogue India)
-
या आधी 'स्टुडंण्ट ऑफ दी इयर' चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते. (सौजन्य – Vogue India)
-
वोग इंडियाच्या ताज्या अंकाच्या मुखपृष्ठावरील छायाचित्रात आलियाने बिकनी तर सिध्दार्थने स्विमिंग पॅण्ट परिधान केली आहे. (सौजन्य – Vogue India)
-
बॉलिवूडची सर्वात तरूण जोडी आलिया भट आणि सिध्दार्थ मल्होत्रा यांच्यातील जवळीक बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय आहे. असे असले तरी आपण दोघे एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे या दोघांकडून सांगण्यात येते. (सौजन्य – Vogue India)
-
अलिकडेच व्हॅलेंटाइनच्या दिवशी दोघे गोव्यात एकत्र नजरेस पडले होते. गौरी शिंदेच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी आलिया गोव्यात दाखल झाली होती. चित्रपटात ती शाहरूख खानसोबत दिसणार आहे. (सौजन्य – Vogue India)
-
याआधीदेखील आलिया सिध्दार्थच्या कुटुंबियांसमवेत रात्रीच्या भोजनाचा आनंद घेताना नजरेस पडली होती. (सौजन्य – Vogue India)
-
आलिया आणि सिध्दार्थची एक आकर्षक छबी. (सौजन्य – Vogue India)
-
आलिया आणि सिध्दार्थचे एका आनंदाच्या क्षणी. (सौजन्य – Vogue India, व्हिडिओमधून)
-
आलिया आणि सिध्दार्थ धमाल-मस्ती करताना. (सौजन्य – Vogue India, व्हिडिओमधून)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल