-
बॉलीवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा मुलगा रायनचा नुकताच ११ वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. रायनच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल माधुरीने आपल्या चाहत्यांचे ट्विटर अकाऊंटवरून आभार व्यक्त करत आपल्या मुलांसोबतच्या काही खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत.
-
माधुरीला अरिन आणि रायन ही दोन मुलं आहेत.
-
लग्नानंतर परदेशात वास्तव्याला गेलेली माधुरी २०११ साली पुन्हा भारतात परतली आणि पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत कमबॅक केले.
-
माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवर रायनचा वाढदिवस मोठ्या उत्साहात सेलिब्रेट करण्यात आल्याचे म्हटले आहे.
-
हाँककाँग पर्यटनावेळी डॉ.श्रीराम नेने यांनी आपल्या मुलांचा टिपलेला फोटो.
-
मुंबईच्या समुद्रकिनारी नारळपाणी पिताना रायन आणि अरिन.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”