-
बोल्ड आणि ब्युटीफूल मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरला प्रेक्षकांनी यशाची आणि लोकप्रियतेची गगनभरारी घेताना पहिले आहे. नेहमीच काही तरी नावीण्यपूर्ण करण्याची आस असलेल्या सईने ऑस्ट्रलियामध्ये 'स्कायडायविंग' करत प्रत्यक्ष गगनभरारीचा चित्तथरारक अनुभव घेतला. 'स्कायडायविंग'साठी सज्ज झालेली सई छायाचित्रात दिसत आहे.
-
'मराठी अचिव्हमेंट्स अॅण्ड अॅवॉर्डस् इंटरनॅशनल'साठी (MAAI) सिडनीला गेलेल्या सईने आपला ऑस्ट्रेलियामधील मुक्काम वाढवत ‘द ग्रेट बॅरिअर रीफ’ला स्कायडायविंगचा आनंद लुटला.
-
आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने रसिकांना आश्चर्याचा धक्का देणाऱ्या ग्लॅमरस सईने स्कायडायविंग करताना तब्बल १५००० फुटांवरून उडी मारून सर्वांना चकीत केले.
-
स्कायडायविंगचा चित्तथरारक अनुभव कथन करताना ती म्हणाली, मला नेहमीच धाडसी गोष्टी करायला आवडतात आणि म्हणूनच मी स्कायडायविंग करण्याचे धाडस करू शकले. माझ्या मित्र-मैत्रिणींनी या धाडसी वृत्तीसाठी मला खूप सहकार्य केले असून, प्रोत्साहनदेखील दिले आहे. विमानातून खाली उडी मारण्याचा क्षण खूप कठीण होता, त्यावर मात करत मी स्कायडायविंग करू शकले याचे मला अप्रूप आहे.
-
स्कायडायविंगचा रोमांचकारी आणि थरारक अनुभ गाठीशी घेऊन प्रसन्न मनाने भारतात परतल्याचं तिने सांगितले.
-
सई ताम्हणकर 'स्कायडायविंग'चा चित्तथरारक अनुभव घेताना.
-
सई ताम्हणकर 'स्कायडायविंग'चा चित्तथरारक अनुभव घेताना.
-
सई ताम्हणकर 'स्कायडायविंग'चा चित्तथरारक अनुभव घेताना.
-
सई ताम्हणकर 'स्कायडायविंग'चा चित्तथरारक अनुभव घेताना.
-
सई ताम्हणकर 'स्कायडायविंग'चा चित्तथरारक अनुभव घेताना.
Sai Tamhankar : सईचे ‘स्कायडायविंग’
सईने ऑस्ट्रलियामध्ये ‘स्कायडायविंग’ करत प्रत्यक्ष गगनभरारीचा चित्तथरारक अनुभव घेतला.
Web Title: Sai tamhankar enjoying skydiving in australia