-
डिस्नेचा द जंगलबुक हा चित्रपट येत्या १५ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. सर्वत्र चर्चेत असलेल्या या चित्रपटाचे नुकतेच फोटोशूट करण्यात आले. विशेष म्हणजे या फोटोशूटमध्ये चित्रपटातील पात्रांसाठी आवाज देणा-या कलाकारांनी ज्या प्राण्यासाठी आवाज दिलेला आहे त्याच्या कलाकृतीसह पोज दिली आहे. त्रपटात ‘मोगली’हे एकच मनुष्य पात्र असून बाकी सगळे प्राणी असणार आहेत. त्यामुळे लहान मुलांबरोबरच मोठय़ांचीही या चित्रपटाबाबची उत्सुकता वाढली आहे. ‘द जंगल बुक’मध्ये बाल कलाकार नील सेठी याने ‘मोगली’ची भूमिका साकारली असून चित्रपटातील प्राण्यांच्या पात्रांना हॉलीवूडमधील टॉपच्या कलाकारांनी आवाज दिला आहे. या चित्रपटाचे हिंदीतही रुपांतरण करण्यात आले असून त्यास बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध कलाकारा नाना पाटेकर, ओम पुरी, प्रियांका चोप्रा, इरफान खान, शेफाली शहा यांनी आवाज दिला आहे. याची हिंदी आवृत्ती भारतात ८ एप्रिलला प्रदर्शित होईल.
-
क्रिस्तोफर वॉकेन आणि किंग लुई
-
स्कार्लेट जॉन्सन आणि का
-
इद्रीस अल्बा आणि शेर खान
-
सर बेन किंग्स्ले आणि बघिरा
-
लुपिटा न्योनगो आणि रक्षा
-
जियानकार्लो एस्पोसिटो आणि अकेला
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य