-
ग्लॅमर आणि अभिनयाच्या जोरावर दुनियाभरात नाव कमवणाऱे बॉलीवूड अभिनेते अभ्यासातही काही मागे नाहीत. केवळ अभिनयातचं नाही तर शिक्षणातही आपलं नाण खणखणीत वाजवणा-या कलाकारांविषयी जाणून घेऊया.
-
बॉलीवूडचे शहेनशहा अशी ओळख असलेले अमिताभ यांनी नैनीतालच्या शेरवुड कॉलेमधून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातील किरोडीमल कॉलेजमध्ये त्यांनी विज्ञान आणि कला शाखेत शिक्षण पूर्ण केले. बिग बी यांना ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिर्व्हसिटीमधूनही मानद पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.
सुशांत सिंग राजपूतने आभियांत्रिकीच्या तिस-या वर्षी आपले शिक्षण सोडले. -
इम्रान खानने न्यू यॉर्क फिल्म अकॅडमीमधून फिल्म मेकिंगचे शिक्षण घेतले आहे. -
जॉन अब्राहमने एमबीए केले आहे.
-
इकॉनॉमिक्समधून ग्रॅज्युएट असलेल्या शाहरुखने जमिया मिलिया इस्लामिया महाविद्यालयात मास कम्युनिकेशनसाठी प्रवेश घेतला होता. पण त्याने मध्यातच आपले शिक्षण सोडले.
३ इडियट्समधील चतुर म्हणजेच ओमी वैद्य याने न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीमधून पदवी शिक्षण घेतले आहे. -
परिणितीने अंबाला कॉन्वेन्ट स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती लंडनला गेली. तेथे तिने इकॉनॉमिक्स, बिझनेस आणि फायनान्स या तीन विषयांत पदवी घेतली.
शिमला कॉलेमधून इंग्रजी विषयात पदवी घेण्यासह प्रीती झिंटाने सॉयकॉलॉजीमध्येही डिग्री घेतली. त्यानंतर तिने क्रिमीनल सायकॉलॉजीमध्ये मास्टर्स केले. -
आर. माधवनही उच्च पदव्युत्तर आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या बेस्ट एनसीससी कॅडेटमध्ये त्याची निवड करण्यात आली. त्यानंतर त्याला इंग्लंडला जाण्याचीही संधी मिळाली होती.
रिचा चड्डाने हिस्टरीमधून बॅचलर डिग्री घेतली आहे. सोहा अली खानने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅण्ड सायन्स येथून आंतरराष्ट्रीय नातेसंबंधांवर मास्टर डिग्री केली आहे. -
अभिनेत्री अमिषा पटेल इकॉनॉमिक्समध्ये गोल्ड मेडलिस्ट राहिली आहे. याव्यतिरिक्त अमिषाने बायोजेनेटिक इंजिनीयरिंगचीही पदवी घेतलीये.
सोनू सूदने नागपूरच्या यशवंतराव महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.

“माकडतोंड्या, बोबडा बोलतो…सूरजचा सिनेमा फ्लॉप करायचा ठरवलं होतं”, केदार शिंदेंचा ट्रोलर्सबाबत मोठा दावा, म्हणाले…