-
‘बालिका वधू’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी (२४) हिने शुक्रवारी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. प्रेमसंबंधांत निर्माण झालेल्या तणावामुळे प्रत्युषाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज मुंबई पोलिसांनी वर्तवला आहे. (छाया- इन्स्टाग्राम)
-
मूळची जमशेदपूरची असलेली प्रत्युषा २०१० सालापासून मुंबईत राहात होती. तिच्या ‘बालिका वधू’ या मालिकेला अफाट लोकप्रियता मिळाली. तब्बल तीन वर्षे ही मालिका सुरू होती. तेव्हापासून प्रत्युषा कायम प्रसिद्धीच्या झोतात होती. (छाया- इन्स्टाग्राम)
-
गुलमोहर ग्रँड, कॉमेडी क्लासेस, कुमकुम भाग्य, मन मे है विश्वास या मालिका व कार्यक्रमांतही प्रत्युषाचा सहभाग होता. (छाया- इन्स्टाग्राम)
-
अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या प्रत्युषाचे खासगी आयुष्य मात्र तणावाचे होते. २०१३ मध्ये तिने प्रियकर मकरंद मल्होत्राविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. तसेच पोलिसांनी आपल्या घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याची तक्रारही प्रत्युषाने कांदिवली पोलीस ठाण्यात नोंदवली होती. (छाया- इन्स्टाग्राम)
-
अलीकडेच तिचे राहुलराज सिंग या दिग्दर्शकाशी प्रेमसंबंध जुळले होते. यंदा आपण लग्नगाठ बांधणार असल्याचेही प्रत्युषाने मित्रपरिवारात जाहीर केले होते. (छाया- इन्स्टाग्राम)
-
राहुलने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने प्रत्युषा प्रचंड तणावात होती. त्याच अवस्थेत ती अलीकडेच गोरेगाव लिंक रोड येथील ‘हार्मनी रेसिडेन्शिअल’ मध्ये राहण्यास आली होती. मुलीच्या मानसिक अवस्थेच्या पार्श्वभूमीवर प्रत्युषाची आई तिच्यासोबत राहण्यास आली होती. मात्र, शुक्रवारी प्रत्युषाने गळफास लावून आत्महत्या केली. (छाया- इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात तिचा प्रियकर राहुल राज सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरु आहे. (छाया- इन्स्टाग्राम)
पोलीस राहुलला घेऊन सिद्धार्थ रुग्णालयात दाखल झाले तेव्हाचे छायाचित्र. (छाया- एएनआय) -
प्रत्युषाची आई रुग्णालयात दाखल झाली तेव्हाचे छायाचित्र. (छाया- एएनआय)
-
पोलीस राहुलला घेऊन सिद्धार्थ रुग्णालयात दाखल झाले तेव्हाचे छायाचित्र. (छाया- एएनआय)
-
-
काही काळ चौकशी केल्यानंतर पोलीस राहुलला घेऊन सिद्धार्थ रुग्णालयात दाखल झाले आहेत. सिद्धार्थ रुग्णालयात प्रत्युषाचे पार्थिव ठेवण्यात आले आहे. दरम्यान, प्रत्युषाचे आई वडिलही मुंबईत दाखल झाले असून ते सिद्धार्थ रुग्णालयात पोहोचले आहेत. (छाया- इन्स्टाग्राम)
-
आनंदीच्या भूमिकेतून घराघरात आपली छाप सोडलेल्या प्रत्युषा बॅनर्जीने गोरेगावमधल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुल राज सिंगने तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. (छाया- इन्स्टाग्राम)
-
बॅनर्जीच्या मृत्यूमुळे टीव्ही कलाकारांना मोठा धक्का बसला सहकलाकारांनी तिच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. (छाया- इन्स्टाग्राम)
-
प्रत्युषाने आत्महत्या केली यावर अद्याप कोणाचाच विश्वास बसला नसून तिच्यासारखी खंबीर मुलगी असे पाऊल उचलणार नाही, असेच अनेकांचे म्हणणे आहे. (छाया- इन्स्टाग्राम)
-
-
-
-
प्रत्युषाचा सहकलाकार आणि अभिनेता अजाज खाननेही असेच मत व्यक्त केले असून ' प्रत्युषाचा मृत्यू ही आत्महत्या नसून सुनियोजित हत्या आहे' असा दावा त्याने केला आहे. (छाया- इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री डॉली बिंद्रानेही तिच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करतानाच तिच्यासारखी खंबीर मुलगी आत्महत्येसारखे पाऊल उचलणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. (छाया- इन्स्टाग्राम)
-

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”