-
बॉलीवूड किंग शाहरूख खान याने त्याच्या कारकीर्दीची सुरूवात खलनायकी व्यक्तिरेखा साकारण्यापासून केली. 'दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे' या चित्रपटाद्वारे बॉलीवूडचा 'रोमान्स किंग'चा किताब मिळविण्यापूर्वी शाहरूखने 'बाझीगर', 'अंजाम', 'डर' या चित्रपटांतील त्याचे खलनायक चांगलेच लोकप्रिय ठरले होते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फॅन' या चित्रपटातही त्याने असाच नेगेटिव्ह रोल साकारला आहे. यानिमित्ताने त्याने खलनायक रंगवलेल्या चित्रपटांवर टाकलेली एक नजर.
-
'बाझीगर' या चित्रपटात शाहरूख खानने सुडाच्या भावनेने झपाटलेला आणि अतिश्य थंड डोक्याने योजना पार पाडणारा मारेकरी रंगवला होता.
-
१९९३ मध्ये आलेल्या 'डर' या चित्रपटात साकारलेल्या खलनायकी व्यक्तिरेखेने शाहरूखने अनेकांची वाहवा मिळवली. या चित्रपटातील 'कककक… किरण' ही त्याची नाव उच्चारण्याची विशिष्ट लकब चांगलीच लोकप्रिय झाली होती.
-
१९९४ मध्ये माधुरी दीक्षितसोबत काम केलेल्या 'अंजाम' या चित्रपटात शाहरूखने आणखी एक उत्कृष्ट खलनायक रंगवला. या चित्रपटातील त्याने खलनायक रंगवण्यासाठी हावभाव आणि बॉडी लँग्वेजचा उत्कृष्टपणे वापर केला होता.
-
'राम जाने' या चित्रपटात शाहरूखने एका गुन्हेगाराची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याने आवाज बदलण्याचाही प्रयोग केला होता.
-
१९९८ मध्ये आलेल्या 'डुप्लिकेट' या चित्रपटात शाहरूखने डबल रोल आणि खलनायक साकारला होता.
-
अमिताभ बच्चन यांच्या 'डॉन' या चित्रपटाचा रिमेक असलेल्या 'डॉन' या चित्रपटात शाहरूखने निर्दयी खलनायक रंगवला होता. खोलवर आणि परिपक्व संवादफेकीच्या जोरावर शाहरूखने ही व्यक्तिरेखा उत्तमप्रकारे रंगवली होती.
Pahalgam Terror Attack Live Update: पाकिस्ताननं भारतासाठी हवाई हद्द बंद केली, पुढे काय? केंद्रीय मंत्री म्हणतात, “जर ही परिस्थिती वर्षभर राहिली…”