-
बॉलीवूड अभिनेत्री बिपासा बसू आणि करण सिंग ग्रोवर हे आज लग्नबंधनात अडकत आहेत. करणची दुसरी पत्नी आणि अभिनेत्री जेनिफर विंगेट ही आता घटस्फोटाच्या धक्क्यातून सावरली आहे. करणसोबतचे लग्न त्यानंतर झालेला त्यांचा घटस्फोट आणि आता करण-बिपाशाचे लग्न याविषयी जेनिफरनी केलेली वक्तव्य जाणून घेऊया.
-
करणसोबत झालेल्या आपल्या विवाहाविषयी बोलताना जेनिफर म्हणते की, हा एक अनुभव होता. जणू काही मी सुंदर अशी रोलर कोस्टर राइडच घेतली असावी. मला माहित आहे की आमच्या नात्यात मी माझे ५००% टक्के दिले आणि त्यासाठी माझ्यावर कोणीही बोट दाखवू शकत नाही. माझ्या आयुष्यातील एकाही दिवसाबाबत मला पश्चात्ताप वाटत नाही. माझ्या मनात कोणतीही कटूता नाही. आता मी एका आनंदी जगात आहे.
-
करण आणि जेनिफरच्या घटस्फोटाची बातमी जेव्हा समोर आली तेव्हा ती म्हणाली की, आमच्या घटस्फोटाचे कागदपत्र लीक झाल्याने मी दुःखी झालेय. त्यावर माझा पत्ता आणि फोन नंबर होता. माझ्याविषयी अशी कोणतीही वैयक्तिक माहिती समोर येऊ नये असेच मला वाटते.
-
जेनिफरसोबत विवाह झाल्याबाबत करणने खंत व्यक्त केली होती. त्यावर जेनिफर म्हणाली की, तो त्याचा दृष्टिकोन आहे. तो काय विचार करतो यावर मी काहीच बोलू शकत नाही.
-
करण आणि बिपाशाच्या विवाहाबाबत जेनिफर म्हणाली की, हॅप्पी मॅरीड लाइफ. माझ्याकडून त्यांना खूप सा-या शुभेच्या. ते दोघे खूप चांगले जोडपे होतील. जवळ येऊ इच्छिणा-या दोन व्यक्तींच्या आयुष्यात लग्न ही खूप सुंदर गोष्ट असते. देव त्यांचे भलं करो. प्रेम ही अप्रतिम गोष्ट आहे आणि जर तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीसाठी ही भावना असेल तर खूपच चांगले आहे.
-
घटस्फोटानंतर जेनिफर आता अविवाहीत आयुष्य जगतेय. त्याविषयी ती म्हणाली की, खूप अप्रतिम. मी कधीच एकटी राहिली नाही आणि आता वयाच्या ३० व्या वर्षी मी एकट्याने आयुष्य जगतेय. आता मी अधिक विकसित झालेय. लोकांना मी समजू शकते आणि मी मूर्ख नाही. प्रत्येक मुलीने वयाच्या ३० व्या वर्षी 'सिंगल' असावे. 'मुक्त' असणे ही सुद्धा 'एक मुक्त' भावना आहे. यावेळेला, माझ्या आयुष्यात कशाचीच कमतरता असल्याचे मला वाटत नाही.
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील ४ संशयित दहशदवाद्यांना पाहिल्याचा महिलेचा दावा; जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथे शोध मोहिम सुरू