-
नागराज मंजुळेच्या सैराट या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला रिंकु राजगुरु आणि आकाश ठोसर हे दोन नवे चेहरे मिळाले. या चित्रपटातील आपल्या उत्कृष्ट अभिनयाबबद्दल रिंकुला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आली. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून रिंकूच्या खासगी आयुष्याविषयीच्या ब-याच बातम्या तुम्ही वाचल्या असतील. मात्र चित्रपटातील हिरो आकाशच्या खासगी आयुष्याविषयी फारसे कुठे बोलले जात नाहीये. म्हणून आम्ही आकाशविषयीची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलोय.
आकाशबद्दल गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आल्यामुळे त्याचे विकिपिडिया पेजही तयार करण्यात आले आहे. आकाशची जन्मतारीख २४ फेब्रुवारी १९९३ असून तो आता २३ वर्षांचा आहे. आकाश मुळचा पुण्याच्या औंध येथील राहणारा आहे. -
आकाशला नाना पाटेकर आणि अंकुश चौधरी हे अभिनेते आवडतात. त्यामुळे या कलाकारांना भेटण्याचीही त्याची फार इच्छा आहे.
-
आकाशने औंधमधील एसएसव्हीएम शाळेतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने पुण्याच्या युनिव्हर्सिटीतून पदवी शिक्षण घेतले.
शिक्षण पूर्ण करत असताना आकाशने काही नाटकांमध्येही भाग घेतला. आकाश अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मल्ल होता. त्याला कुस्तीची खूप आवड आहे. नागराजने सर्वप्रथम आकाशचे सहकलाकाराच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेतले होते. पण आकाशच्या अभिनयाने प्रभावित होऊन त्यानंतर त्याला मुख्य भूमिकेसाठी घेण्यात आले. सैराटसाठी आकाशने आठवड्याभरात चार तर महिनाभरात तेरा किलो वजन कमी केले होते.

‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral