-
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपट तिकीटबारीवर वेगाने कमाईचे नवनवे विक्रम करतो आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अद्भूत अशी कामगिरी करत ‘सैराट’ या चित्रपटाने ८५ कोटींच्या वर गल्ला जमविण्याचा मान पटकाविला आहे. रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर या नवोदित कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज बरोबर ५० दिवस झाले. तरीही चित्रपटगृहांमध्ये याच चित्रपटाची मक्तेदारी आपल्याला पाहावयास मिळत आहे. आर्ची आणि परशाची ही प्रेमकथा अजूनही राज्यभरातील चित्रपटगृहांमधून हाऊसफुल्ल गर्दी खेचते आहे. ‘सैराट’ ची जादू अजूनही कायम असून प्रेक्षक ३-३ वेळा सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहातायंत.
-
दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या 'सैराट' चित्रपटाने चित्रपटसृष्टीत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने कमाईचे आजवरचे सर्व विक्रम मोडले आहेत. परशा-आर्चीच्या प्रेम कहाणीला प्रेक्षकांनी डोक्यावर तर घेतलं आहेच पण चित्रपटातील काही सीन्स देखील प्रेक्षकांना खूप भावले आहेत. चित्रपटातील काही निवडक सीन्सचा हा छायाचित्र संग्रह..
-
परशा अर्थात अभिनेता आकाश ठोसर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आर्चीच्या चपलांवर गुलाबाची फुलं ठेवतो हा क्षण प्रेक्षकांना खूप भावला.
-
चित्रपटातील 'सैराट झालं जी' गाण्याचा शेवट ज्या ठिकाणी चित्रीत करण्यात आला आहे तो हा सीन प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे.
-
आर्चीच्या प्रेमात आकंठ बुडालेला परशा विहिरीत उडी मारतो तेव्हाचा क्षण.
-
परशा, आर्ची आणि त्यांचे मित्र गावातून पळून जातानाचा क्षण.
-
आर्चीचा बुलेटवरून दमदार एण्ट्रीचा क्षण..
-
'सैराट झालं जी' गाण्यातील मनमोहक क्षण.
-
आर्ची आणि परशा पावसात चिंब भिजलेले असतानाचा क्षण.
-
सैराटचे वेगळेपण म्हणजे. लहान-लहान गावात या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
-
'सैराट झालं जी' गाण्यातील आणखी एक मनमोहक क्षण..जिथे परशा आर्चीला एका झाडावर घेऊन जातो.
-
करमाळा येथील विहीरीत चित्रीत केलेले दृष्य प्रेक्षकांना खूप आवडले.
-
करमाळा व तालुक्यातील जेऊर, केम, कंदर, चिखलठाण, वांगी, मांगी, पोफळज, मांजरगाव इत्यादी आसपासच्या गावांत चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य