-
बॉलीवूडचा 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' सलमान खान वर्षाअखेरीस बोहल्यावर चढणार असल्याचे निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. सलमानच्या लग्नाची तारीख देखील निश्चित करण्यात आली आहे.
-
प्रेयसी लुलिया वेंतूरसोबत सलमान डिसेंबरमध्ये विवाहबद्ध होणार आहे.
-
माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तानुसार सलमानचे लग्न त्याच्या वाढदिवशी म्हणजेच २७ डिसेंबर रोजी होणार आहे.
-
सलमानच्या कुटुंबियांनी सलमानला लग्नासाठी तयार केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
सलमान आणि त्याच्या कुटुंबियांच्या प्रत्येक खास कार्यक्रमात लुलिया वेंतुर उपस्थित असल्याचे याआधी अनेकवेळा दिसून आले आहे.
-
लुलिया वेंतुर सलमानपेक्षा तब्बल १५ वर्षांनी लहान आहे.
-
नुकतेच सलमान आणि त्याची आई सलमा खान यांच्यासोबत लुलिया वेंतुर मुंबई विमानतळावर दिसून आली होती. यावेळी लुलिया सलमानच्या आईची काळजी घेताना दिसून आली.
-
सलमानच्या घरी देखील लुलियाचे कुटुंबातील सदस्याप्रमाणे सहज येणे-जाणे सुरू असते.
-
सलमानच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत देखील लुलिया पाहुण्यांची खान कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणेच काळजी घेताना दिसून आली होती. पार्टीत उपस्थित असलेल्या प्रत्येकाची ती विचारपूस करत होती.
-
लग्नाच्या तयारीसाठी सलमान दोन महिन्यांची सुटी घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण करणार नाही.
-
लग्नाआधी सलमान हेअर ट्रीटमेंट देखील करणार आहे. या हेअर ट्रीटमेंटवेळी सलमानसोबत लुलिया देखील जातीने उपस्थित असणार आहे. ट्रीटमेंटनंतर सलमानला उन्हात बाहेर पडण्यास डॉक्टरांनी मज्जाव केला आहे. त्यामुळे तो या काळात चित्रीकरण करणार नाही.
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल