-
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या पहिल्यावहिल्या हॉलीवूडपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवसाची सेटवरची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. दीपिका 'xXx: Return of Xander Cage' या चित्रपटातून हॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी दीपिकाकडून बाईक चालवण्याचा सीन शूट करुन घेण्यात आला. (छाया- ट्विटर)
-
'xXx: Return of Xander Cage' चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी दीपिका काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसून आली. एका बायकरप्रमाणे दीपिकाला वेशभुषा देण्यात आली होती.
-
अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने फेब्रुवारी महिन्यापासून टोरान्टो येथे 'xXx: Return of Xander Cage' या आपल्या आगामी हॉलीवूडपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली होती. दीपिकाने या चित्रपटासाठी अत्याधुनिक बनावटीच्या रायफल्स हाताळण्याचे प्रशिक्षण देखील घेतले आहे. 'xXx: Return of Xander Cage' या चित्रपटातून दीपिका हॉलीवूड स्टार विन डिझेलसोबत हॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.
-
दीपिकाच्या हॉलीवूड पदार्पणाच्या गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा आहे. तिचे चाहते तिची हॉलीवूडमधील एण्ट्री मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
-
चित्रीकरणादरम्यान मार्शल आर्टीस्ट मायकेल बिस्पिंग यांच्यासोबत चर्चा करताना दीपिका. (छाया- ट्विटर)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”